• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prediction 2026 : जग हादरणार, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ, सोन्या-चांदीचे भाव… 2026 मध्ये ग्रहांच्या दिशेमुळे काय होणार परिणाम ?

November 29, 2025 by admin Leave a Comment


New Year 2026 Prediction : 2025 हे वर्ष संपायला फार काळ उरलेला नाही, तर अवघ्या महिन्याभरानंतर 2026 हे वर्षही सुरू होईल. 2026 हे वर्ष ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप खास मानले जात आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, 2026 मध्ये ग्रहांच्या मंत्रिमंडळातही बदल होईल. 2025 वर्षाचा अधिपती मंगळ आहे, जो ग्रहांचा सेनापती आहे, परंतु 2026 चा अधिपती गुरु असेल. 2026 मध्ये, ग्रहाच्या मंत्र्यांचे पद मंगळ ग्रहाकडे असेल. 2026 या वर्षासाठी ज्योतिषी भाकिते करत आहेत. तर, येत्या वर्षासाठी ही ग्रहमाला काय दर्शवते ते जाणून घेऊया. तसेच, नवीन वर्षात देश आणि जगावर त्याचा संभाव्य परिणाम काय होईल हेही समजून घेऊया.

भारत आणि जगावर कसा असेल प्रभाव ?

2026 मध्ये ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती सामान्य राहील. नवीन वर्षाचा स्वामी मंगळ असल्याने, सामाजिक आणि राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. देशात आणि जगात संघर्ष कायम राहू शकतात. भारतात राजकीय अशांतता दिसून येऊ शकते. बंडखोरीच्या घटना घडू शकतात. मंगळाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.

सायबर फसवणुकीच्या केसेसमध्ये होणार वाढ ?

एवढंच नाही तर लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी होईल. या वर्षी सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. 2026 मध्ये संपत्ती मिळवणे सोपे होईल, परंतु ती टिकवणे कठीण असेल. 2026 हे वर्ष वडिलोपार्जित मालमत्ता, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्षात व्यापारी युद्ध होऊ शकते. परदेशात भारतीय व्यावसायिक व्यवहारांबाबत धोरणे आखली जातील. त्यामुळे ह वर्ष अतिशय महत्वाचे ठरणार आहे.

नवीन वर्षात रोजगाराच्या संधी वाढतील. सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही आणखी मोठी वाढ होऊ शकते. गुरु ग्रहाच्या प्रबळ प्रभावामुळे धार्मिक कार्यक्रम वाढू शकतात. शिवाय, आर्थिक क्षेत्रात मंद पण स्थिर प्रगती दिसून येईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BMC Election 2025: ठाकरे बंधू अन् शिंदेंच्या शिवसेनेची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचार सभेसाठी कुणाला परवानगी?
  • पाकिस्तानचा झेंडा पाहिला अन्…; सुनील शेट्टीने सांगितला ‘बॉर्डर’चा क्लायमॅक्स कसा शूट झाला?
  • मृत्यू होताना व्यक्तीच्या बाजूला ठेवा या दोन वस्तू, गरुड पुराणात सांगितलंय असं काही की…
  • अमेरिकेत 2BHK चे भाडं किती? डिपॉझिट आणि ब्रोकरेजचं गणित काय? जाणून घ्या
  • फोन वाजला, तुम्ही कॉल घेतला परंतू आवाज नाही आला ? स्कॅमरचे आता नवे तंत्र

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in