
पोस्ट खात्याची टाईम डिपॉझिट (TD) योजना बँक एफडी सारखीच काम करते. परंतू पोस्टाच्या योजनेत व्याज जास्त आहे. 1, 2, 3 आणि 5 वर्षाच्या कालावधींचे पर्याय आहेत. सर्वात मोठी सुविधा, ही योजना केंद्र सरकारची गॅरंटी स्कीम आहे.त्यामुळे यात पैसा सुरक्षित असतो.
पोस्ट ऑफीसच्या एफडीवर कालावधीनुसार 6.9% ते 7.5% पर्यंत व्याज मिळते. पाच वर्षांच्या एफडीत सर्वात जास्त 7.5% व्याज मिळते. जे कोणत्याही बँकेच्या सामान्य एफडीहून जास्त आहे. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर ही योजना रिटर्नच्या बाबतीत सर्वात सुरक्षित आहे.
तुम्ही 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर तुमची मॅच्युरिटी रक्कम 7.5 % वार्षिक व्याजदराने 144,995 रुपये होईल. याचा अर्थ तुम्हाला संपूर्ण 44,995 रुपये व्याज मिळेल. हा परतावा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला आहे.
या एफडीत तुम्ही किमान 1000 रुपयांनी खाते उघडू शकता आणि कमाल गुंतवणूकीची कोणतीही सीमा नाही. म्हणजे छोटे गुंतवणूकदार असो किंवा मोठे सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही सिंगल वा जॉईंट खाते अशा दोन्ही पद्धतीने एफडी खोलू शकता. ज्यात कमाल तीन लोक जोडले जाऊ शकतात.
पोस्ट ऑफीसची एफडीत थेट केंद्र सरकारद्वारा चालते. यात पैसे वाया जाण्याचा कोणताही धोका नाही. सर्व ग्राहकांना समान व्याज दर मिळते. तर बँका वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे व्याज देतात. सरकारची गॅरंटी, जास्त व्याज आणि सुरक्षित रिटर्नयामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ही योजना विश्वासार्ह पर्याय आहे.




Leave a Reply