• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi : नैसर्गिक शेती हे भारताचे भविष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लिंक्डइनवर खास पोस्ट

December 3, 2025 by admin Leave a Comment


भारत हा कृषिप्रधान देश आहे, भारतातील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लिंक्डइनवर एक पोस्ट करत नैसर्गिक शेतीबद्दल आपले विचार माडंले आहेत. “दोन आठवड्यांपूर्वी मी कोइम्बतूर येथे झालेल्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी होतो, यामुळे मी प्रभावित झाले असं पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पोस्ट मध्ये मोदींनी लोकांना नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, यंदा ऑगस्टमध्ये तामिळनाडूतील काही शेतकऱ्यांची आणि माझी उेच झाली. शाश्वतता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी नवीन शेती तंत्रे कशी स्वीकारत आहेत यावर चर्चा झालीय त्यांनी मला कोइम्बतूर येथे होणाऱ्या नैसर्गिक शेतीवरील शिखर परिषदेत सहभागी होण्याचा आमंत्रण दिले होते. मी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि काही आठवड्यांपूर्वी 19 नोव्हेंबर रोजी या परिषदेत सहभागी होण्यासाठी कोइम्बतूरमध्ये गेलो होतो. एमएसएमईचे केंद्र मानले जाणाऱ्या या शहराने नैसर्गिक शेतीवरील या प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करत केले होते.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, नैसर्गिक शेती ही भारताच्या पारंपारिक ज्ञान प्रणाली आणि आधुनिक पर्यावरणीय तत्त्वांपासून प्रेरित आहे. यात कृत्रिम रसायनांशिवाय पिके घेतली जातात. यात वनस्पती, झाडे आणि प्राणी यांचा वापर करून नैसर्गिक जैवविविधतेला आधार दिला जातो.

कोइम्बतूरमधील ही परिषद नेहमीच माझ्या आठवणीत असेल. भारतातील शेतकरी आणि कृषी-उद्योजक विचार आणि आत्मविश्वास कसा बदलत आहेत आणि शेतीचे भविष्य घडवत आहेत हे मला समजले. या कार्यक्रमात तामिळनाडूतील शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. यावेळी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतील त्यांच्या प्रयत्नाबाबत माहिती दिली, जे ऐकून मी आश्चर्यचकित झालो!

PM Modi natural Farrming

शास्त्रज्ञ, एफपीओ नेते, पदवीधर, पारंपारिक शेतकरी आणि विशेषतः भरघोस पगाराची नोकरी सोडून अनेकजण नैसर्गिक शेतीकडे वळले असल्याचे मला समजले. मी अशा लोकांना भेटलो ज्यांचा जीवन प्रवास आणि नवीन कल्पना उल्लेखनीय होती. एका शेतकऱ्याने केळी, नारळ, पपई, काळी मिरी आणि हळद यासह सुमारे 10 एकरात बहुस्तरीय शेती केली. त्याने 60 देशी गायी, 400 शेळ्या आणि स्थानिक कोंबड्या देखील पाळल्या होत्या.

दुसऱ्या शेतकऱ्याने मप्पिलई सांबा आणि करूप्पू कावुनी सारख्या देशी भाताच्या जातींचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या शेतकऱ्यांनी मूल्यवर्धित उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी पफ्ड राईस, चॉकलेट आणि प्रोटीन बार तयार केले. एक पदवीधर होता जो 15 एकरात नैसर्गिक शेती करत होता. तसेच तो 3000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत होता. तो दरमहा 30 टन भाज्यांचे उत्पादन घेत होता. स्वतःचे एफपीओ चालवणाऱ्या काही व्यक्तींनी टॅपिओका शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि बायोइथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅससाठी शाश्वत कच्चा माल म्हणून टॅपिओका-आधारित उत्पादनांना प्रोत्साहन दिले.

एक बायोटेक्नोलॉजीचे शिक्षण घेतलेला शेतकरी होता, त्याने समुद्री शैवाल-आधारित जैवखत उपक्रम तयार केला होता. त्याने किनारी जिल्ह्यांमध्ये 600 मच्छिमारांना रोजगार दिला होका. आणखी एकाने मातीची ताकद वाढवणारा पोषक तत्वांनी समृद्ध, जैवक्रिय बायोचार विकसित केला होता. या दोघांनी विज्ञान आणि शाश्वतता कशी अखंडपणे एकत्र करता येते हे दाखवून दिले.

PM Modi natural Farrming

मला भेटलेले लोक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले होते, मात्र त्यांच्यात एक गोष्ट समान होती. मातीचे आरोग्य, शाश्वतता, सामुदायिक उन्नती हे त्यांचे टार्गेट होते. व्यापक पातळीवर, भारताने या क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती केली आहे. गेल्या वर्षी, भारत सरकारने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केले, ज्याने लाखो शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतींमध्ये सहभागी करून घेतले आहे.

देशभरात हजारो हेक्टर जमीनीवर नैसर्गिक शेती केली जात आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणे, किसान क्रेडिट कार्ड (पशुधन आणि मत्स्यपालनासाठी समावेश) आणि PM-KISAN द्वारे संस्थात्मक कर्जाचा लक्षणीय विस्तार करणे या सरकारी प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यात मदत झाली आहे. नैसर्गिक शेतीचा श्री अन्न किंवा बाजरी यांना प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांशी जवळचा संबंध आहे. महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती स्वीकारत आहेत हे पाहून मला आनंद होतो.

गेल्या काही दशकांमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढल्यामुळे मातीची सुपीकता, ओलावा आणि दीर्घकालीन शाश्वततेवर परिणाम झाला आहे. तसेच शेतीचा खर्च वाढला आहे. नैसर्गिक शेती थेट या आव्हानांना तोंड देते. पंचगव्य, जीवनामृत, बीजामृत आणि मल्चिंगचा वापर मातीच्या आरोग्याचे रक्षण करतो, रासायनिक संपर्क कमी करतो आणि इनपुट खर्च कमी करतो.

जमिनीच्या अगदी लहान तुकड्यातूनही मिळणारे परिणाम आत्मविश्वास वाढवू शकतात. जेव्हा पारंपारिक ज्ञान, वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि संस्थात्मक आधार एकत्र येतात तेव्हा नैसर्गिक शेती शक्य आणि परिवर्तनकारी बनू शकते. मी तुम्हा सर्वांना नैसर्गिक शेतीचा विचार करण्याचे आवाहन करतो. तुम्ही हे FPO मध्ये सामील होऊन करू शकता, जे सामूहिक सक्षमीकरणासाठी एक मजबूत व्यासपीठ बनत आहेत. तुम्ही या क्षेत्रातील स्टार्टअप्सवर देखील संशोधन करू शकता.

कोइम्बतूरमध्ये शेतकरी, विज्ञान, उद्योजकता आणि सामूहिक कृती यांच्यातील समन्वय पाहणे माझ्यासाठी खरोखर प्रेरणादायी होते. मला विश्वास आहे की एकत्रितपणे आपण आपली शेती आणि संबंधित क्षेत्रे उत्पादक आणि शाश्वत बनवत राहू. जर तुम्हाला नैसर्गिक शेतीवर काम करणाऱ्या गटांबद्दल माहिती असेल त्याबद्दल नक्की माहिती सांगा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘बिग बॉस 19’नंतर पालटलं प्रणित मोरेचं नशीब! अवघ्या काही मिनिटांत घडली ‘ही’ मोठी गोष्ट, चाहतेही खुश
  • कुठली गोष्ट मिळवण्यासाठी देवाचं नाम जप करणं स्वार्थीपणा? प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिलं?
  • Horoscope Today 16 December 2025 : आज संधी मिळणार, ते काम पूर्ण होणारच.. या राशीच्या लोकांवर मंगळवारी होणार बाप्पाची कृपा !
  • पुन्हा मुसळधार पाऊस, या 4 राज्यात अलर्ट जारी, थेट इशारा, भारतीय हवामान विभागाने…
  • रितेश देशमुख याने थेट कॅमेऱ्यासमोर केले हे कृत्य, व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला पाहून..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in