
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची (PMFBY) व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरु केली होती. आता यात दोन आणखी नुकसानाची भरपाई मिळणार आहे. त्यात जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि अतिवृष्टीने किंवा पुराने झालेली पिकहानी यांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर दिली आहे.. त्यांना शेतकऱ्यांना याबद्दल खुशखबरी सांगताना सांगितले की नैसर्गिक संकटाने होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ही पिक विमा योजना तयार केली होती. परंतू दोन प्रकारचे नुकसान कव्हर आतापर्यंत यात मिळत नव्हते.ज्याची मागणी शेतकरी बऱ्याच काळापासून करत होते.
शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी पूर्ण
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की शेतकऱ्याची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. शेतकरी जंगली जनावराच्या शेतातील नुकसान केल्याने आणि पुरजन्य परिस्थिती अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान यांचा पिक विम्यात समावेश नव्हता. नव्या व्यवस्थेत दोन्ही कॅटगरींना जोडून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. ते म्हणाले की जर जंगली जनावरांना शेतीचे नुकसान केले. तर आता भरपाई मिळणार आहे. तसेच अतिवृष्टीने शेतात पाणी भरल्याने पिक वाया गेले तरी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
PM च्या मंजूरीनंतर नवे बदल लागू केले
केंद्रीय मंत्र्यांनी एक्सवर माहिती देताना सांगितले की पंतप्रधानांचे या निर्णयाबद्दल आपण शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानत आहोत. हे नवीन बदल शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशीर न करता पिक विम्यासाठी अर्ज भरावा. कारण ही योजना आता अधिक व्यापक आणि समावेशी सुरक्षा प्रदान करणार आहे.
शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा होणार ?
हा निर्णय खास करु त्या क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना फायदा देणार आहे. जेथे दरवर्षी जंगली जनावरांचा धोका असतो. वा जेथे मान्सून दरम्यान पाणी साचल्याने पिके खराब होतात.
काय आहे पंतप्रधान पिक विमा योजना ?
पंतप्रधान पिक विमा योजनेचा (PMFBY)उद्देश्य शेतकऱ्यांना किफायती दरात पिक विमा उपलब्ध करणे हा आहे. या योजनेंतर्गत पेरणीच्या पहिल्या फेरीपासून कापणीपर्यंत पिकांना गैर –प्रतिबंधित नैसर्गिक जोखीमेला सुरक्षा दिली जाते. याचा हेतू कृषी उत्पादनांना सुरक्षित ठेवणे आणि शेतकऱ्यांना व्यापक जोखीम कव्हरेज प्रदान करतो.
येथे पाहा पोस्ट –
प्रिय किसान बहनों और भाइयों…
आज आपको एक खुशखबरी दे रहा हूँ। प्राकृतिक आपदाओं के कारण फसलों के नुकसान पर हमारे प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना बनाई है।
लेकिन इसमें दो नुकसान कवर नहीं थे, जिसकी लंबे समय से आप मांग कर रहे थे।
पहला:- जंगली… pic.twitter.com/sERW3pK7kz
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) November 20, 2025
Leave a Reply