• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Physical Relation: 40% स्त्रियांमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दिसतात ही लक्षणे, तुम्हीही यातल्या असाल तर…?

November 29, 2025 by admin Leave a Comment


जर शारीरिक संबंध ठेवताना दुखापत होत असेल, इच्छा कमी झाली असेल किंवा ऑर्गॅझम मिळणे कठीण जात असेल, तर ही “महिला यौन विकार” (Female Sexual Dysfunction) असू शकते. प्रत्येक 10 पैकी 4 स्त्रियांना ही समस्या जाणवते. त्यावर नेमके काय उपाय करावे? तसेच डॉक्टरांचे म्हणणे काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर…

पोषणतज्ज्ञांच्या मते, महिलेला यौन विकार झाला असेल तर तिची इच्छा कमी होणे, उत्तेजना न येणे, दुखापत होणे किंवा संबंधात आनंद न मिळणे यांचा समावेश होतो. हे फक्त शारीरिक कारणांमुळेच नाही तर मानसिक तणाव, नात्यातील अंतर आणि हार्मोन्समधील चढ-उतार यामुळेही वाढते. डॉक्टर म्हणतात,  ही समस्या मेनोपॉज, काही औषधांचे साइड इफेक्ट्स, मानसिक तणाव, नातेसंबंधातील तणाव किंवा आयुष्यातील नवे बदल यांमुळे होऊ शकते.

याची लक्षणे कोणती?

जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर ओळखा:

– शारीरिक संबंधाची इच्छाच कमी झाली आहे

– एका सर्व्हेनुसार जवळपास निम्म्या स्त्रियांना आता संबंध पूर्वीप्रमाणे आनंददायी वाटत नाहीत

इच्छा का कमी होते?

– सतत तणाव, चिंता किंवा उदासीनता

– खूप कमी खाणे किंवा अतिव्यायाम

– काही औषधांचा परिणाम

– भावनिक जोड कमी पडणे

– गर्भधारणा, स्तनपान, मेनोपॉजदरम्यान हार्मोन्समध्ये बदल

काय उपाय करावेत?

– पुरेशी झोप घ्या

– संतुलित आहार घ्या

– तणाव कमी करण्याच्या सवयी लावा

– मानसशास्त्रज्ञ किंवा वैवाहिक सल्लागाराची मदत घ्या

– रक्ततपासणी करा

– हार्मोन्सचा तोल बिघडला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

ऑर्गॅझमपर्यंत पोहोचणे कठीण होणे

संशोधन सांगते की अनेक स्त्रिया संबंधादरम्यान ऑर्गॅझमपर्यंत पोहोचतच नाहीत. ही समस्या अचानक वाढली असेल तर ती यौन विकाराची लक्षण असू शकते. यावर कोणते उपाय करावे जाणून घ्या…

उपाय:

– तुम्ही घेत असलेली औषधे डॉक्टरांकडून तपासून घ्या

– रक्तात व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता तपासा

– थंडीत व्हिटॅमिन डी घ्या

संबंधात दुखापत होणे

संबंध ठेवताना दुखापत झाली की अनुभव कटू होतो आणि हळूहळू मनही दूर होऊ लागते.

डॉक्टरांच्या मते कारणे कोणती असू शकतात:

– संसर्ग (इन्फेक्शन)

– पेल्विक भागात सूज

– योनीच्या स्नायूंमध्ये आकडा येणे

– गर्भाशयाच्या आजार

– अंडाशयात गाठ

– आतड्यांच्या समस्या

काय करावे?

– सर्वप्रथम तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा

– संबंधादरम्यान पोझिशन बदलून पहा

– उत्तेजना वाढवणारे काही करा

– ल्युब्रिकंट (चिकनाई देणारे प्रोडक्ट) वापरा

– ओमेगा-३ भरपूर असलेला आहार घ्या (मासे, अलसी, अक्रोड)

– दही आणि आंबवलेले पदार्थ खा, ते संसर्गापासून वाचवतात

तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर लाज सोडून डॉक्टर किंवा तज्ज्ञांशी नक्की बोला. ही खूप सामान्य समस्या आहे आणि तिचे उपायही आहेत.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मृत्यू होताना व्यक्तीच्या बाजूला ठेवा या दोन वस्तू, गरुड पुराणात सांगितलंय असं काही की…
  • अमेरिकेत 2BHK चे भाडं किती? डिपॉझिट आणि ब्रोकरेजचं गणित काय? जाणून घ्या
  • फोन वाजला, तुम्ही कॉल घेतला परंतू आवाज नाही आला ? स्कॅमरचे आता नवे तंत्र
  • माझे शरीर सुजले होते, प्रेग्नेंसी मोठा झटका होता…’ राधिका आपटेने तिला प्रेग्नेंसीवेळी आलेला तो अनुभव सांगितला
  • 2025 मधील शेवटचा प्रदोष कधी? 17 की 18 डिसेंबर? जाणून घ्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in