
आजघडीला पर्सनल लोन घेणे फारच सोपे झाले आहे. अनेक अॅप्स, बँका तुम्हाला काही क्लिकवर लोन देतात. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर तुम्हाला वेगळ्या कागदपत्रांची गरजही नसते. अगदी कमी वेळेत तुम्हाला पर्सनल लोन भेटू शकते. परंतु अशा प्रकारचे लोन घेताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्याकडून काही चुका झाल्यास तुमचा मोठा तोटा होऊ शकतो.
अगदी कमी वेळेत पर्सनल लोन मिळत आहे, म्हणून तुम्ही कशाचाही विचार न करता कर्जाची सर्व प्रक्रिया पार पाडता आणि पुढच्याच काही मिनिटांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. परंतु अशा प्रकारचे पर्सनल लोन घेतानात तुम्ही या कर्जाची परतफेड करताना किती रुपयांचा ईएमआय भारावा लागतोय, याचा विचार करणे गरेजेचे आहे.
अनेकदा बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करताना अगदी कमी रकमेचा ईएमआय देते. पण कमी ईएमआय भरावा लागत असेल तर तुम्ही घेतलेल्या पर्सनल लोनवर खऊप जास्त व्याज भरावे लागते. म्हणूनच ईएमआय कमी असेल तर व्याज किती भरावे लागत आहे, हे एकदा तपासा.
पर्सनल लोन घेताना तुमच्यापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्ही पर्सनल लोन घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला जीएसटी, डॉक्यूमेंटेशन चार्च, प्रोसेसिंग फी अशा प्रकारचे चर्जेस भरावे लागतात. त्यामुळे तुमच्यावर हा अतिरिक्त भार पडतो. पर्सनल लोन घेताना तुम्हाला अशा पद्धतीने किती रुपये अतिरिक्त भरावे लागत आहेत, हे अगोदर जाणून घ्या. नंतरच पर्सनल लोनसाठी अर्ज करा.
फारच गरज असेल तेव्हाच तुम्ही पर्सनल लोन घ्यावे. कारण पर्सनल लोनवर तुम्हाला बँक तुम्हाला तारण मागत नाही. त्यामुळेच अशा प्रकारच्या कर्जावर व्याजदर खूप जास्त असतो. लग्न, वैद्यकीय आणीबाणी अशा प्रकारच्या कठीण काळात तुम्ही पर्सनल लोन घेऊन शकता. अन्यथा अशा प्रकारचे कर्ज घेणे टाळा.




Leave a Reply