
निवडणूक आयोगाने काही नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांना दिलेल्या स्थगितीवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्थगित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. मतदानाला एक दिवस असताना स्थगिती अयोग्य असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे, मनसेने पनवेल मतदार यादीतील घोळावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या मतदार यादीतील घोळावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला आहे. मतदार याद्यांमध्ये एकाच व्यक्तीला २६८ मुले असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याचा मनसेचा दावा आहे. मनसेने पनवेल तहसीलदार कार्यालयात याबाबत वाद घातला असून, अशा मतदारांना मतदानाला आल्यास चोप देण्याचा इशारा दिला आहे. मतदार यादीतील हा घोळ तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी मनसेने केली आहे. अन्यथा, यासाठी जबाबदार लोकांना परिणाम भोगावे लागतील, असे मनसेने स्पष्ट केले आहे.
Leave a Reply