
Nora Fatehi : ‘दिलबर’, ‘साकी-साकी’ आणि ‘कुसू-कुसू’ गाण्यात भन्नाट डान्स करत चाहत्यांना थक्क करणारी अभिनेत्री नोरा फतेही आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. नोरा कधी तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही सांगत नाही… पण आता अभिनेत्री लग्न करणार आहे.. असं देखील कळत आहे. तर एका लोकप्रिय खेळाडूला नोरा डेट करत असल्याची माहिती समोर येत आहे.सांगायचं झालं तर, 2022 मध्ये नोरा हिने फिफा(FIFA) वर्ल्डकपमध्ये परफॉर्म केलं होतं. तेव्हा नोरा हिने ‘लाइट द स्काय सॉन्ग’ हे गाणं गायलं होतं. असं पहायला गेलं तर, नोरा हिचे फुटबॉलसोबत फार जुनं नातं आहे. पण आता फुटबॉल खेळाडूसाठी देखील नोरा हिच्या आयुष्यात खास स्थान आहे..
मिळालेल्या रिपोर्टनुसार, नोरा फतेही एका कोट्यवधी फुटबॉलरला डेट करत आहे… ज्यांच्या प्रेमापोटी ती आफ्रिकन कप ऑफ नेशन्स 2025 फुटबॉल सामना पाहण्यासाठी मोरोक्कोला पोहोचली. रिपोर्ट्सनुसार, नोराच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा समोर आल्या जेव्हा तिला दुबई आणि मोरोक्कोमध्ये एकाच पुरूषासोबत स्पॉट करण्यात आलं.
सांगायचं झालं तर, दोघांसाठीही, विशेषतः नोरासाठी गोपनीयता खूप महत्त्वाची आहे, कारण तिला सध्या फक्त आणि फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यामुळे ती तिचं वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवण्यास प्राधान्य देते.
रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, नोरा एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय फुटबॉलरला डेट केलं आहे. पण याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही… ही पहिली वेळ नाही, जेव्हा नोरा हिचं नाव अन्य सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं आहे…
याआधी नोरा हिचं नाव प्रिंस नरूला, अंगद बेदी आणि टेरेंस लुईस यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं आहे. एवढंच नाही तर, नोराचं अमेरिकन गीतकार बेन्सन बूनसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
नोरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री तिच्या डान्समुळे अधिक चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
Leave a Reply