
मालवण पोलीस ठाण्यात भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्याच्या घरात बेकायदेशीररित्या शिरल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विजय केनवडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षितच होते. ज्यांच्या घरात पैसे सापडले, त्यांना कोणतीही नोटीस नाही, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावलेही नाही. मात्र गुन्हा पकडून देणाऱ्यांवरच केसेस होत आहेत. त्यांनी पोलिसांना आपल्याला अटक करण्याचे आव्हान दिले असून, आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हे प्रकरण राजकीय दबावाखाली सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Leave a Reply