
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चांवर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काल कोणतीही बैठक झाली नसून, या चर्चा निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदारांसाठी एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्नेहभोजन काही ठराविक निमंत्रितांसाठी होते आणि त्यानुसार अजित पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी कोणती खासगी बैठक झाली नसल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही अजित दादांनी दिलेल्या भूमिकेसोबत आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राष्ट्रवादी पक्ष एकत्र पुढे जाईल की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. सध्या तरी दोन्ही गटांमध्ये एकत्रीकरणासाठी कोणतीही बैठक झाली नसल्याचे आदिती तटकरे यांनी अधोरेखित केले.
Leave a Reply