
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी एकाच दिवशी दिल्लीत भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सुनील तटकरे यांनी सुरुवातीला ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले, तरी खासदार लंके यांनी भेटीमागील दोन प्रमुख कारणे स्पष्ट केली. या भेटीचे एक मुख्य कारण म्हणजे शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून शौर्य पाटीलने दिल्लीत आत्महत्या केली होती आणि सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी खासदार लंके यांनी अमित शहांकडे केली. अमित शहांनी तात्काळ एसआयटी नेमण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः नुकत्याच घोषित झालेल्या महानगरपालिका निवडणुकांवर चर्चा झाली.
Leave a Reply