
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्द्यावरून मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. राणा यांच्या मते, जर बाबरच्या नावाने मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील, कारसेवा करतील आणि ती तोडण्याचे काम करतील. त्यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्याचे नाव भागीरथ धाम असे ठेवण्याची मागणी केली आहे. भविष्यात निवडणुका झाल्यावर भाजप तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचे नाव बदलले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने ६० वर्षे सत्ता टिकवण्यासाठी समाजात फूट पाडली, असे त्या म्हणाल्या. आता रामाला मानणारे सरकार सत्तेत असल्याने त्यानुसार काम होईल, असेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply