
नाशिकच्या तपोवनात झाडांवर संशयास्पद जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत असताना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या कार्यकर्त्यांना काही झाडांवर तावीज बांधलेली आढळली. ही तावीज अरेबियन किंवा उर्दू भाषेत लिहिलेली असून, ती जादूटोण्याचा प्रकार असल्याचा दावा अंनिसने केला आहे. अंनिसच्या म्हणण्यानुसार, दुश्मनांवर जादूटोणा करण्यासाठी किंवा करणी करण्यासाठी अशा तावीजांचा वापर केला जातो. हे प्रकार महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा आहेत. अंनिसने ही तावीज काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. भीतीयुक्त वातावरण तयार होऊ नये आणि समाजात प्रबोधन व्हावे यासाठी अंनिस ही भूमिका घेत आहे. हा जादूटोण्याचा प्रकार तपोवनमधील वृक्षतोड आंदोलनाशी संबंधित नसल्याचेही अंनिसने स्पष्ट केले.
Leave a Reply