
नाशिकमध्ये भाजपच्या पक्षप्रवेशांवरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या भाजप प्रवेशांवर आमदार देवयानी फरांदे यांनी फेसबुक पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. देवयानी फरांदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, निवडणूक प्रमुख असूनही त्यांना या पक्षप्रवेशासंदर्भात विश्वासात घेण्यात आले नाही. प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. फरांदे यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देवयानी फरांदे यांच्याकडे होती आणि त्यांनी एक पॅनलही तयार केले होते. मात्र, विनायक पांडे, शाहू खैरे आणि यतीन वाघ यांच्या आजच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे बोलले जात आहे.
Leave a Reply