• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Municipal Election: मोठी बातमी! सोलापूर महापालिकेची निवडणुकीला ब्रेक? का होत आहे मागणी, कारण तरी काय?

December 17, 2025 by admin Leave a Comment


Municipal Corporation Election: राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असतानाच सोलापूरमधूम एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या संभ्रम तयार झाला आहे. का करण्यात येत आहे ही मागणी? काय आहे त्यामागील कारण?

सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकला

सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यात्रेदरम्यानच महानगरपालिकेची निवडणूक येत असल्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. याच कालावधीत निवडणुकीतील मतदान आणि मतमोजणी होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना एक निवेदनही पाठवले आहे.

सोलापूर महानगरपालिकेची 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. या दोन दिवसात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेचा प्रमुख सोहळ्यातील धार्मिक विधी असतात. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेला 900 वर्षाची अखंड परंपरा आहे. या निवेदनात श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा 14 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेचे नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्राद्वारे केली आहे.

जळगाव महापालिकेची प्रारुप मतदार अंतिम यादी प्रसिद्ध

जळगावत महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवार तसेच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापालिकेच्या एकूण 19 प्रभागांमध्ये मतदारांची अंतिम यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या 17 मधली इमारतीमधील चौदाव्या मजल्यावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महापालिकेच्या 19 प्रभागामधील 75 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. महापालिकेचे चौदाव्या मधल्या वरील अभिलेखा कक्षात उमेदवार तसेच नागरिकांसाठी अंतिम यादी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांची अंतिम प्रारूप यादी विक्रीसाठी देखील उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहे. जळगाव शहरात दुबार मतदारांसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असून महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा पाहायला मिळत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manikrao Kokate : रमीपासून ढेकळाच्या पंचनाम्यापर्यंत… महाराष्ट्राला संताप आणणारी माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधाने कोणती ?
  • Pahalgam Attack : पहलगामचा हल्ला हे भारत सरकारचंच षडयंत्र; अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ
  • भारताचा पहिल्याच दिवशी पराभव, पाकिस्तानने पाडली होती विमान, पृथ्वीराज चव्हाण यांचा ऑपरेशन सिंदूरबाबत खळबळजनक दावा…
  • Sushma Andhare : ड्रग्स प्रकरण, बंधु प्रकाश शिंदेंवरुन सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खळबळजनक आरोप
  • घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असताना पतीने उरकले गुपचूप लग्न, पत्नीला समजताच तिने जे केलं…; तुम्हाला बसेल धक्का

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in