• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Municipal Election: मित्रपक्षाला विचारतो कोण? भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, महापालिकेसाठी स्वबळाची तयारी?

December 16, 2025 by admin Leave a Comment


Municipal Corporation Election BJP Candidate : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 15 जानेवारीला मतदान तर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिकेतील प्रशासतक राज जाणार आहे. पण या निवडणुकीत भाजपमधून लढण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. एका एका प्रभागातून भाजपसाठी इच्छुकांची लांबच लांब रांगा लागल्या आहेत. राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीसाठी हेच चित्र आहे. इच्छुकांची ही भाऊगर्दी पाहुन भाजपला आनंदाचे भरते आले आहे. पक्षश्रेष्ठींनी महायुतीचा नारा दिला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र उमेदवारांनी महायुती नाकारत स्वबळाचा सूर आळवला आहे. काय आहे अपडेट?

स्वबळासाठी कार्यकर्ते आग्रही

नागपूर महानगरपालिकेचा शंखनाद झाल्यानंतर आता उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्रित लढणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्र्यांपासून प्रमुख नेत्यांनी सांगितलं आहे. मात्र नागपुरातील राजकीय गणित लक्षात घेता येथे भाजपने स्वबळावरच निवडणूक लढण्यात यावी असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून सरासरी एका जागेसाठी 15 हून अधिक दावेदार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील निवडणुकीत भाजपला 108 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली होती. त्यामुळे हे सारे समीकरण बघता महायुती होणार की भाजप नागपुरात एकला चलो ची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेस गेमचेंजर ठरणार?

महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप चौकार मारणार की काँग्रेस गेमचेंजर ठरणार याकडे लक्ष लागलं आहे. भाजपसाठी चौथ्यांदा सत्तेत येण्याची प्रतिष्ठा लागली आहे तर काँग्रेसला सत्ता मिळविण्याची आस लागली आहे. भाजप कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ,महसूल मंत्री बावनकुळे यांचा झंझावात दिसेल. तर काँग्रेसकडून विकास ठाकरे , नितीन राऊत यांच्या सारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्याची शक्यता आहे. मागील इतिहास बघता भाजपला रोखण्याच मोठं आव्हान काँग्रेस समोर असेल.

मुलखतीसाठी तोबा गर्दी

नागपूर महापालिका निवडणुका घोषणा झाल्याबरोबर भाजपच्या गोटात उमेदवारी बाबत हालचालींना वेग आला आहे. प्रभाग पातळीवरील निरीक्षकांनी मुलाखती घेतल्यानंतर आता भाजपच्या कार्यालयात आजपासून मुलाखतीचे सत्र सुरू होणार आहे. सोबतच पक्षाकडून निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 ते 19 डिसेंबर या कालावधीत भाजपच्या गणेश पेठ कार्यालयात होतील. विधानसभा व प्रभाग नुसार मुलाखती होणार आहे 16 डिसेंबर रोजी पूर्व व पश्चिम नागपूर , 17 डिसेंबर रोजी उत्तर व दक्षिण नागपूर , 18 डिसेंबर रोजी दक्षिण- पश्चिम व मध्य नागपूर अशा मुलाखतीत होतील.

इच्छुकांची उसळली मोठी गर्दी

सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांसाठी 3 दिवसांचे मुलाखत सत्र चालणार आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडे 1200 हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आजपासून तीन दिवस भाजप कार्यालयात मुलाखती होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी एकटे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुलाखतीला येताना कोणतेही शक्ती प्रदर्शन न करण्याचा आदेश भाजप शहर कार्यालयाने दिला आहे. या मुलाखत सत्रासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शहरातील 3 आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तांत्रिक परंपरा की अंधश्रद्धा? ‘स्मशान विद्या’भोवती नवे प्रश्न
  • तुमच्या ‘या’ 4 सवयी अलक्ष्मीच्या घरात राहण्याचे कारण बनू शकतात, जाणून घ्या
  • पुढील 30 दिवसांत देश, जगाची काय स्थिती असणार? जाणून घ्या
  • Bollywood Celebrity : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा, शाहरुख-ऐश्वर्यासोबतही केलं काम, तरीही ठरला फ्लॉप; अखेर अभिनयाला रामराम, आता जगतो…
  • क्लब मॅनेजरने प्रायव्हेट रूमची दिली ऑफर, नाकारताच वॉशरूमजवळ… पतीचा पायच तोडला, नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in