
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईसाठी 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये अनेक प्रमुख नावांचा समावेश असून, यामध्ये तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड क्रमांक 2), नील सोमय्या (वॉर्ड क्रमांक 107), नवनाथ बन (वॉर्ड क्रमांक 135) यांचा समावेश आहे. वरळीतून राजेश कांगडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. इतर उमेदवारांमध्ये गणेश खणकर (वॉर्ड क्रमांक 7), तेजिंदर सिंग तिवाना (वॉर्ड क्रमांक 47), मकरंद नार्वेकर (प्रभाग क्रमांक 226), हर्षिता नार्वेकर (वॉर्ड 227), आकाश पुरोहित (वॉर्ड क्रमांक 222), शिवानंद शेट्टी (वॉर्ड 9), शिल्पा सांगोरे (वॉर्ड क्रमांक 17), स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड क्रमांक 218), अजय पाटील (वॉर्ड क्रमांक 214), सन्नी सानप (वॉर्ड क्रमांक 219) आणि शिवकुमार झा (वॉर्ड क्रमांक 23) यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, शिंदेच्या सेनेला मतदारसंघात सहा पैकी चार जागा सुटल्या आहेत. यात सदा सरवणकरांच्या दोन मुलांना, समाधान सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मिलिंद तांडेल आणि कुणाल वाडेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. चिंबूरच्या माजी नगरसेवक अनिल पाटणकरांच्या पत्नी मिनाक्षी पाटणकर यांनी वॉर्ड क्रमांक 153 मधून निवडणुकीसाठी ए बी फॉर्म घेतला आहे. यामुळे मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांची घोषणा वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.
Leave a Reply