• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai : BKT कडून केईएम रुग्णालय येथे अत्याधुनिक क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन

December 17, 2025 by admin Leave a Comment


मुंबई, 14 डिसेंबर 2025 : ऑफ-हायवे टायर (OHT) उद्योगातील जागतिक अग्रणी कंपनी Balkrishna Industries Ltd. (BKT) यांनी त्यांच्या CSR उपक्रमांतर्गत The BKT Foundation च्या माध्यमातून मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालयासोबत पार्टनरशीप करून रुग्णालय परिसरात 15,000 चौरस फूटांहून अधिक क्षेत्रफळाचे अत्याधुनिक क्रीडा दुखापत व पुनर्वसन केंद्र स्थापन केले आहे. हा महत्त्वपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य सेवेतील प्रगती दर्शवतो, तसेच भारताच्या वेगाने विकसित होत असलेल्या क्रीडा क्षेत्राला पाठबळ देण्याच्या BKT च्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.

या केंद्राचे उद्घाटन 14 डिसेंबर 2025 रोजी अरविंद पोद्दार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, BKT आणि विजयलक्ष्मी पोद्दार, अध्यक्षा, BKT-CSR समिती यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भूषण गगराणी, महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) होते. यावेळी BMC चे वरिष्ठ अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त, शरद उघाडे, उपमहापालिका आयुक्त तसेच डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, KEM रुग्णालय उपस्थित होते.

नवीन केंद्रातून खेळाडूंना जागतिक दर्जाच्या पुनर्वसन सेवा मिळणार असून त्यामुळे जलद रिकव्हरी, कामगिरीत सुधारणा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्जता वाढणार आहे. या केंद्राद्वारे दरवर्षी 1,000 हून अधिक खेळाडूंना मदत होणार आहे. त्याचबरोबर येथे 500 पेक्षा अधिक विशेष शस्त्रक्रिया करता येणार आहेत.हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत पश्चिम भारतातील सर्वात व्यापक पुनर्वसन केंद्रांपैकी हे एक ठरेल.

या केंद्राचे नेतृत्व क्रीडा तज्ञ व ऑर्थोपेडिक्स विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. रोशन वाडे हे आपल्या टीमसह करणार आहेत. शल्यचिकित्सक, थेरपिस्ट आणि आहारतज्ज्ञांचा बहुविषयक संघ एका छताखाली एकत्र येऊन समग्र उपचार सेवा पुरवेल.

या केंद्रात 20 खाटांचे वॉर्ड, तीन पूर्ण सुसज्ज ऑपरेशन थिएटरसह आधुनिक शस्त्रक्रिया संकुल, ICU-सह postoperative काळजी आणि व्यापक पुनर्वसन युनिट उपलब्ध आहे. येथे हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी, अंडरवॉटर व झिरो-ग्रॅव्हिटी ट्रेडमिल, व्हर्च्युअल रिअॅलिटी-आधारित पुनर्वसन प्रणाली, तसेच विशेष गेट लॅब अशा प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे. OPD संकुलात सल्लामसलत कक्ष, इन-हाऊस रेडिओग्राफी (एक्स-रे व स्कॅनोग्राम) सुविधा आणि टेकार, लेझर, अल्ट्रासोनिक, शॉकवेव्ह व इलेक्ट्रोथेरपी यांसारख्या विविध हस्तक्षेपात्मक उपचारांचा समावेश आहे.

The BKT Foundation च्या माध्यमातून BKT ने या केंद्राच्या उभारणीसाठी सुमारे 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून उपकरण पुरवठादारांसोबत दीर्घकालीन देखभाल व पायाभूत सुविधा सहाय्यासाठी बहुवर्षीय सामंजस्य करार (MoU) केला आहे. हा प्रकल्प मजबूत आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करणे आणि भारताच्या वाढत्या क्रीडा परिसंस्थेला बळकटी देणे या BKT फाउंडेशनच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत आहे.

या दीर्घकालीन दृष्टीकोनाबद्दल बोलताना अरविंद पोद्दार म्हणाले, की ‘BKT मध्ये आम्हाला विश्वास आहे की समुदाय एकत्र पुढे जातात तेव्हाच खरी प्रगती होते. ‘Growing Together’ हे आमच्यासाठी केवळ घोषवाक्य नाही; ते आमचे निर्णय मार्गदर्शित करते. KEM रुग्णालय आणि BMC सोबत हे केंद्र उभारताना आमचा उद्देश प्रत्येक खेळाडूसाठी जागतिक दर्जाचे उपचार सुलभ करणे हा आहे. हे केंद्र अनेक खेळाडूंना अधिक सक्षमपणे पुनरागमन करण्यास मदत करेल, याची आम्हाला खात्री आहे.’

या उपक्रमामागील CSR दृष्टीकोनाचे नेतृत्व सांगताना विजयलक्ष्मी पोद्दार म्हणाल्या की, ‘हा प्रकल्प BKT ज्या मूल्यांसाठी उभा आहे त्यांचे प्रतिबिंब आहे – काळजी, सन्मान, सुलभता आणि सक्षमीकरण. उपचार सन्मानपूर्वक व्हावेत आणि पुनर्प्राप्तीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक खेळाडूला आधार मिळावा, अशी जागा निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट होते. आमच्या तरुणांनी त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा आणि उत्कृष्टतेच्या मार्गावर आम्ही त्यांच्यासोबत आहोत, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे.’

या उपक्रमामुळे BKT ची परवडणारी, सुलभ, उच्च दर्जाची आणि समुदाय-केंद्रित आरोग्यसेवा देण्याची दीर्घकालीन बांधिलकी अधिक मजबूत होते. प्रगत क्रीडा पुनर्वसन सेवांमध्ये सार्वजनिक प्रवेश वाढवून, BKT भारताच्या क्रीडा परिसंस्थेला पाठबळ देत आहे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या, कामगिरी करू शकणाऱ्या आणि भरभराट करणाऱ्या खेळाडूंची मजबूत साखळी उभारण्यास मदत करत आहे. हे केंद्र देशासाठी अधिक निरोगी आणि सक्षम क्रीडा भविष्याकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

BKT प्रेस रूममध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा

BKT विषयी माहिती

Balkrishna Industries Ltd. (BKT) ही भारतस्थित टायर उत्पादक कंपनी आहे. कृषी, औद्योगिक, अर्थमूव्हिंग, खाणकाम, ATV आणि बागकाम क्षेत्रातील वाहनांसाठी खास डिझाइन केलेल्या ऑफ-हायवे टायर्सची विस्तृत आणि सातत्याने अद्ययावत उत्पादन श्रेणी BKT कडून उपलब्ध आहे. विविध वापरकर्त्यांच्या गरजांसाठी डिझाइन केलेल्या BKT च्या नाविन्यपूर्ण उपायांमध्ये 3,600 हून अधिक उत्पादने असून ती 163 पेक्षा अधिक देशांमध्ये विकली जातात. अधिक माहितीसाठी www.bkt-tires.com ला भेट द्या. अलीकडेच, BKT ने रबर ट्रॅक्स चे उत्पादन सुरू केले आहे. अधिक माहितीसाठी www.bkt-tracks.com ला भेट द्या.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • केळीच्या पानावर का खावे? केळीच्या पानावर खाण्याचे फायदे काय? जाणून घ्या
  • आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते..; ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा कडक ट्रेलर
  • राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीचे उद्घाटन, भारतीय शूर वीरांच्या छायाचित्रांनी घेतली ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या फोटोंची जागा
  • स्वतःच्या ‘या’ 7 वस्तू दुसऱ्यांना कधीच देऊ नका? आयुष्यात येतील अडथळे
  • जिल्हापरिषद निवडणुकीआधी कायद्यात मोठा बदल, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 सर्वात मोठे निर्णय!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in