
मीरा-भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील साईबाबा हॉस्पिटलमागे असलेल्या पारिजात बिल्डिंगमध्ये सकाळी आठ वाजता एक बिबट्या शिरला. बिबट्याने इमारतीतील एका रुममध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने तीन ते चार जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिबट्या इमारतीत शिरल्याचे आणि हल्ला केल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकवस्तीत बिबट्याचा शिरकाव झाल्याने संपूर्ण मीरा-भाईंदर परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. नागरिकांची मोठी गर्दी इमारतीबाहेर जमली असून, बिबट्याला कधी जेरबंद केले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply