
फुटबॉलचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्यामुळे मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. त्याच्या आगमनासाठी शहरात विशेष तयारी करण्यात आली असून, वांद्रे सी लिंक आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. मेस्सी उद्या मुंबईमध्ये दाखल होणार असून, तो वानखेडे स्टेडियमला भेट देणार असल्याची माहिती आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याला पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. सी लिंकवर मेस्सीचे मोठे एलईडी बॅनरही लावण्यात आले आहेत, जे त्याच्या स्वागताची शोभा वाढवत आहेत.
Leave a Reply