
मनोज जरांगे पाटील यांनी मृत शौर्य पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभाग घेतला. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी शौर्य पाटील प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. जर अमित शहा यांनी या प्रकरणी लक्ष दिले नाही, तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा अपमान होईल आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रकरणात अमित शहांना कारवाईसाठी सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी स्पष्ट केले की, जर न्याय मिळाला नाही, तर शौर्य पाटील यांच्यासाठी दिल्लीत मोठे आंदोलन छेडण्यात येईल. या प्रकरणात राजकारण करायचे नसून, फक्त न्याय मिळवणे हेच उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply