
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात न्यायलयाने 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे अडचणीत सापडले. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी मोबाईलवर रमी खेळतानाचा वाद आणि आता सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरले, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये सतत वाढ होतानाच दिसत आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल असले तरी त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने जी दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती ती सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अखेर आता कोकाटे यांचे खाते काढून घेण्यात होते, त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचाही राजीनामा दिला. कोकाटे याचं खातं काढून घेतल्यानंतर सध्या ते अजित पवार यांच्याकडे आहे, तर कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची निवड कधी होणार, ते खातं कोणाल मिळणार असे अनेक सवाल उपस्थित होत असून याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर आली आहे.
क्रीडा खातं कोणाकडे? कधी होणार निर्णय ?
माणिकराव कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक जिल्हा परिषद निवडणुका संपल्यावरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपेपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खातं हे अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच मंत्रिपद देताना अजित पवारांकडून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रीपदासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्यामध्ये सध्या माजी मंत्री अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा समावेश आहे.
त्यामुळे आता अजित पवार हे माजी मंत्र्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्याला मंत्रीपदासाठी त्यांची पसंती असेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
बातमी अपडेट होत आहे.
Leave a Reply