
देशात काही दिवसांपूर्वी कडाक्याची थंडी बघायला मिळाली. आता पुन्हा उकाडा जाणून लागला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाचे ढग भारतात आल्यामुळे अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण गंभीर मुद्दा बनलाय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. प्रचार जोरदार पद्धतीने सर्वच पक्षांचा सुरू आहे. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेवर गंभीर आरोप करण्यात आली असून तो पोलिस कोठडीत आहे. अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गाैरी गर्जे हिने आत्महत्या केलीये. मात्र, तिच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणेला विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून 1 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने महार वतनाची जमीन घेतली होती. हा जमीन घोटाळा पुढे आल्यानंतर हा व्यवहार रद्द होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. आता हा व्यवहार रद्द करण्याठी 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यामध्येच अमेडिया कंपनीला 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Leave a Reply