
नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानुसार, महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांची उद्या होणारी मतमोजणी ही आता 21 डिसेंबर रोजी एकत्र होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा उद्या लागणार होता मात्र आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती मतमोजणी पुढे ढकलली आहे. आजचे आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, परंतु निकाल मात्र 21 डिसेंबरलाच जाहीर केले जातील. निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
20 डिसेंबरला मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर करता येतील, तर आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे काही ठिकाणी स्थगित करण्यात आलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे 21 डिसेंबरला समोर येणार आहेत. न्यायालयाने निवडणूक आयोगाने स्वतः हे पाऊल उचलायला हवे होते, असेही नमूद केले.
Leave a Reply