• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra Local Body Election Result 2025 : दादा, वहिनी, मुलगा की बायको? कुणाचं कोण आलं निवडून, गावगाड्यातही घराणेशाहीचा जोर

December 22, 2025 by admin Leave a Comment


महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून जानेवारीच्या मध्यात महापालिका निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वी काल नगरपालिका निवडणुकांचा निकाल काल समोर आला. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले असून महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलं. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या महायुतीचे (Mahayuti) निवडणुकीवर पूर्णपणे वर्चस्व होतं, राज्यात एकूण 288 पैकी 207 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष जिंकून आले.

आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवतो, आमच्या पक्षात घराणेशाहीला स्थान नाही या वाक्याचा भारतीय जनता पक्षाकडून (BJP) वारंवार पुनरुच्चार केला जातो. घराणेशाहीवरून भाजप, काँग्रेसलवर जोरदार टीका करताना दिसतं, पण त्यांच्या पक्षातही फार वेगळं वातावरण नाहीये, या निवडणुकीतूनही हे दिसून आलं. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत घराणेशाहीच जोर स्पष्टपणे दिसत होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत, त्यांची पत्नी, सून, मुलगी आणि इतर नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्याचं दिसत होतं. त्यांना निवडणुकीसाठी थेट तिकीट मिळालं. त्यामुळे भाजपात घराणेशाही नसल्याचा दावा करणारे नेते, आता यावर काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.

गावगाड्यातही घराणेशाहीचा जोर, अनेकांची बिनविरोध निवड

पक्षात घराणेशाही जोरदार दिसून आली, त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री संजय सावकारे, हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आकाश फुंडकर अशा अनेकांचा समावेश होता. या सर्वांच्या नात्यातील कोणी ना कोणीतरी निवडणुकीसाठी उभं होतं, त्यांना थेट तिकीट तर मिळालंच पण कित्येकांच्या घरातीलच उमेदवार निवडून आल्याचं चित्रही कालच्या निकालात दिसलं.

यातील पहिलं , ठसठशीत मोठं उदाहरण आणि नाव म्हणजे भाजप मंत्री गिरीश महाजन. त्यांची पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी तर मिळालीच, पण त्या कोणताही विरोध न होता, अगदी थेट बिनविरोध निवडून देखील आल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ अल्हाद कलोती यांनाही निवडणुकीत संधि मिळाली. आल्हाद यांनी चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचं नाव समोर आल्यावर समोर उब्या असलेल्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने, कलौती यांचा विजय सहज सोपा, आणि बिनविरोध झाला.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपलिका निवडणुकीत भाजपचेच जयकुमार रावल यांची आई नयनकुंवर रावल यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली आणि त्यांची बिनविरोध निवडही झाली. भुसावळचे भाजप आमदार आणि मंत्री संजय सावकारे यांची पत्नी देखील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत होत्या. तर कागल नगरपालिकेतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सून सेहरनिदा मुश्रीफ यांचीही नगराध्यपदासाठी बिनविरोध झाल्याचं दिसून आलं.

भारतीय जनता पक्षाचे मंत्री आकाश फुंडकर यांची वहिनी अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळालं होतं. तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मुलगी वतमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरली होती. तिच्याविरोधात होती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे. इथेही घराणेशाही थेट दिसून आली.

आमदारांनी सोडवेना मोह

हे झालं भाजपच्या मंत्र्यांबाबत, तसंच या पक्षाच्या आमदारांनीही स्वार्थ साधत आपल्या घरातील लोकांना , नातेवाईकांना उमेदवारी, तिकीट मिळवून दिलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर नगरपरिषदेसाठी भाजप आमदार अमरीश पटेल यांचे पुत्र चिंतन यांना भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिकीट मिळालं. तर आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा या चाळीसगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाच निवडणक लढवत होत्या. मूर्तिजापूर नगरपरिषदेतून नगरसेवक पदासाठी भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांचा मोठा भाऊ भूपेंद्र यांना पक्षाकडून टिकीट मिळालं. एवढंच नव्हे तर अक्कलकोट येथील भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी याचा भाऊ मिलन कल्याणशेट्टी यांनाही उमेदवारी मिळाली. धामणगाव रेल्वे नगरपरिषदेसाठी भाजप आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी भाजपने तिकीट दिलं होतं. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स ‘ अशी ओळख सांगणाऱ्या भाजपामध्ये मंत्र्यांपासून आमदारांपर्यंत अनेकांना तिकीट मिळाल्याने इतर पक्षांप्रमाणेच इथेही घराणेशाही दिसून आलीच.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Year Ender 2025 : वर्षाअखेरीस ‘या’ 3 राशींचं फळळफणार नशीब… कोणती आहे तुमची रास?
  • Photo : नागपूरचा आगळावेगळा निकाल… नवरा आणि बायको दोघेही एकाचवेळी जिंकले; कसे?
  • मुलाचं निधन, अतीव दु:ख.., त्या सीनच्या वेदना ‘धुरंधर’च्या अभिनेत्रीच्या मनात राहिल्या कायम
  • BJP Maharashtra : उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन अन् भाजपमध्ये अंतर्गत वाद
  • मनात भक्ती, सतत देवाचे नामस्मरण पण…, देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाचा घाला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in