
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजप सध्या सर्वाधिक नगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपने 100 चा आकडा पार करत 108 जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिवसेना 39 आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी 33 जागांवर आघाडीवर आहे. एकूण महायुतीने 177 जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडी 48 जागांवर पुढे आहे. साताऱ्यात अमोल मोहिते आणि फलटणमध्ये अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे आघाडीवर आहेत. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनीही आघाडी घेतली आहे. मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणि व्हिडिओ शूटिंगद्वारे पारदर्शकपणे केली जात आहे.
Leave a Reply