
विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर विकासाच्या मुद्द्यांवरून टोला लगावला. दोन इमारतींचा प्रश्न आणि गणपतराव कदम मार्गावरील रोड ओव्हर ब्रिजची कामे कधी पूर्ण होणार, असे प्रश्न शिंदे यांनी विचारले. शिंदे यांनी सामंतांना राज्याचे लाडके असे संबोधत म्हणाले, “प्रसाद लाड प्रमाणे आपण राज्याचे लाडके आहात, त्यामुळे आपला तणाव वाढवायचा नव्हता मला.” यावर उदय सामंत यांनीही तितक्याच खुमासदारपणे प्रत्युत्तर दिले. त्यांनी विचारले की, मी कोणाचा लाडका आहे, मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्र्यांचा, हे संशोधनाचा विषय आहे.
तसेच, त्यांनी सुनील शिंदे आणि सचिन आहेर यांना उद्देशून तुम्ही आणि सुनील शिंदे हे वरळीच्या आमदारांचे कोण लाडके आहेत, हे देखील आम्हाला दोघांपैकी कळले पाहिजे, असे म्हणत टोलेबाजी केली. या चर्चेतून शिवडी-वरळी कनेक्टरमुळे वरळी, लोअर परळ आणि डिलाईल रोड येथील रहिवाशांना भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार का, यावरही चर्चा झाली.
Leave a Reply