
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत. या २३ ठिकाणांमध्ये अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागांमधील नगरपरिषदांचा समावेश आहे. एकूण २८८ जागांसाठी घोषणा झाली होती, त्यापैकी २ बिनविरोध तर २३ निवडणुका स्थगित झाल्या. आता २६३ जागांसाठी मतदान होणार आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणुका जाहीर केल्याचे म्हटले आहे. काँग्रेस याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Leave a Reply