
महापालिका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 तारखेला होईल. सध्या प्रशासकांच्या हाती असलेला कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींकडे येईल. मुंबई, नागपूर, पुण्यात चार वर्षांनंतर तर कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नवी मुंबई आदि महापालिकांमध्ये सहा वर्षांनंतर निवडणुका होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचं लक्ष आहे. तर काँग्रेसकडे आता मुंबईत फारसं काही राहिलं नाही, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली काय, नाही लढवली काय फारसा फरक पडत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढणार असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं होतं. नांदेड महानगरपालिकेला युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठी जे निर्देश देतील त्यानुसार निर्णय घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Leave a Reply