
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री माधुरी दीक्षितचे जीवन स्पॉटलाइटमध्ये राहिलं. तिचं हसणं,तिचं दिसणं, डान्स, अदा… या सगळ्याचे लाखो चाहते होते, आजही प्रेक्षकांच्या नात तिचं स्थान अबाधित आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याने लाखो लोकांना मोहित करणाऱ्या माधुरीने (Madhuri Dixit) 1999 साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर अमेरिकेत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेकांचा हृदयभंग झाला होता. त्यावेळी तिची फिल्मी कारकीर्द शिखरावर होती, पण माधुरीने कुटुंबाला प्राधान्य दिले. मात्र काही काळाने ती पुन्हा भारतात आली आणि मोठ्या, छोट्या पडद्यावर, ओटीटीवरही झळकू लागली. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत माधुरीने अमेरिकेत स्थायिक होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल आणि तिच्या मुलांचे, अरिन आणि रायन यांच्या करिअरबद्दल मोकळेपणाने सांगितले.
एका वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीत तिने आपली कारकीर्द शिखरावर असताना ते सोडून परदेशात स्थायिक होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला आणि स्पॉटलाइटपासून कशी दूर राहिली तेही सांगितलं. तिची मुलं – अरिन आणि रियान यांच्याबद्दलही ती मोकळेपणे बोलली. फिल्म इंडस्ट्रीला ते ‘सर्कस’ म्हणत असल्याचे माधुरीने थेट शब्दांत सांगितलं.
लग्न, संसार, मुलं- माधुरीची स्वप्न..
आयुष्याबाबत माधुरी म्हणाली, “जीवनात प्रत्येकाची स्वप्नं असतात आणि हा माझ्या जीवनाचा एक मोठा भाग होता. मी नेहमीच स्वप्न पहायचे मी लग्न करेन, घर घेईन आणि मुले होतील. जेव्हा ते खरं ठरलं तेव्हा ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं, म्हणून मी दोनदा विचार केला नाही. मला ते (श्रीराम नेने) माझा जीवनसाथी म्हणून हवे होते, मी लग्न केलं आणि अमेरिकेत राहायला गेले. तिथे बऱ्याच काळापासून राहणाऱ्या माझ्या भावंडांना मी भेटायचे.’ माधुरी पुढे म्हणाली, ‘मला तिथले जीवन कसे असते हे माहित होते आणि मला सर्वकाही स्वतः करावे लागायचं. पण ते शॉकिंग नव्हतं, मला याची कल्पना होती. मी त्या शांत वेळेचा आनंद लुटला . आपलं काम आपण करणं. कोणी ओळखल्याशिवाय मुलांना उद्यानात घेऊन जाणं… मी तिथे हे क्षण जगू शकले’ असं माधुरीने सांगितलं.
View this post on Instagram
माधुरीच्या मुलांना आवडत नाही फिल्मी दुनिया
माधुरीचा मोठा मुलगा अरिनचा जन्म 2003 मध्ये झाला आणि धाकटा मुलगा रायनचा जन्म 2005 साली मध्ये झाला.दोघांच्याही करिअरच्या आवडी चित्रपट उद्योगापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत असं माधुरीने स्पष्ट केलं. अरिनने 2024 मध्ये पदवी प्राप्त केली आणि आता तो अॅपल कंपनीत काम करतो. तिथे तो नॉईज कॅन्सलेशनशी संबंधिति एका प्रोजेक्टवर काम करतोय. सुरुवातीला त्याला चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा आहे, असे काही संकेत दिसले, पण मला वाटतं की त्याची आवड संगीत आहे. तो स्वतःचे संगीत स्वतः तयार करतो असं माधुरीने सांगितलं. तर माझा छोटा मुलगा हा STEM मध्ये आहे. तो टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथच्या क्षेत्रात आहे. सध्या तो यूनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया (USC)मध्ये शिकतो असं माधुरीने नमूद केलं.
लाइमलाइटपासून मुद्दाम ठेवलं दूर ?
मुलांना लाइमलाइटपासून मुद्दाम दूर ठेवलं का, असा सवाल तिला विचारण्याता आल्यावर माधुरीने स्पष्ट उत्तर दिलं. ” मी त्यांना दूर ठेवलं नाही. जेव्हा त्यांना माझ्यासोबत यायचे होते, तेव्हा मी त्यांना घेऊन गेलं, पण जेव्हा त्यांची इच्छा नसायची, तेव्हा मी त्या इच्छेचा आदर राखला. जेव्हा आम्ही अमेरिकेहून भारतात परतलो तेव्हा ते 6 आणि 8 वर्षांचे होते. माझी मुले वेगळी आहेत; धाकट्याला या संपूर्ण ‘सर्कस’ (फिल्म इंडस्ट्री) मध्ये रस नाही. मोठा मुलगा थोडा ओपन आहे, पण दोघंही धीच या इंडस्ट्रीत आले नाहीत” असं तिने सांगितलं.
माधुरीचं वर्कफ्रंट
कामाबद्दल सांगायचं झालं तर माधुरी दीक्षित हिची ‘मिसेस देशपांडे’ ही वेबसीरिज नुकतीच (19 डिसेंबर) जियोहॉटस्टार रिलीज झाली. नागेश कुकुनूर दिग्दर्शित या सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये माधुरी दीक्षित एका सिरीयल किलरच्या भूमिकेत आहे. या मालिकेत सहा भाग आहेत . तिचे काही चित्रपटही लाईन-अपमध्ये आहेत.
Leave a Reply