
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेनुसारच पार पडतील. एकूण 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये 57 ठिकाणी आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता. यामध्ये 40 नगरपरिषदांचा समावेश आहे. मात्र, न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया थांबवणे योग्य नाही असे स्पष्ट करत या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. ज्या 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या ठिकाणांवरील निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे.
Leave a Reply