
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींपैकी एक म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रात्री उशिरा सुमारे एक तास घेतलेली बैठक. या बैठकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती आणि मुंबई महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. स्वतंत्र लढण्याच्या संदर्भात पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत कुठे-कुठे युती होणार, याची घोषणा नगरपरिषद निकालांनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेसोबत प्राधान्याने युती करणार आहे. मात्र, जिथे युती होत नाही, तिथे स्थानिक पातळीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांसोबत आघाडीची बोलणी करण्याचे संकेतही बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती मिळाली आहे.
Leave a Reply