• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Loan EMI Trap : कर्जाचा विळखा घेऊ शकतो तुमचा जीव, EMI चा ट्रॅप कसा ओळखायचा? कसं बाहेर यायचं?

December 27, 2025 by admin Leave a Comment


Loan Trap : आजकाल बहुसंख्य लोक कर्ज घेऊनच वस्तू खरेदी करतात. बँका वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, वाहन कर्ज सहज देतात. त्यामुळेच आजघडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे. काही लोकांचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार तर EMI मध्येच जातो. कोणताही पूर्वविचार न करता घेतलेले कर्ज नंतर डोईजड होते आणि लोक कर्जाच्या विळख्यात सापडतात. दरम्यान, कर्जाच्या विळख्यात अडकण्याआधी काही संकेत मिळतात. या संकेतांकडे पाहून वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्यापुढे भविष्यात मोठे आर्थिक संकट उभे राहू शकतो. हे संकेत नेमके कोणते आहेत? कर्जाच्या विळख्यात अडकून न पडण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? ते जाणून घेऊ या…..

जुने कर्ज फेडण्यासाठी नवे कर्ज घेणे

एकदा व्यक्ती कर्जात अडकली की ती लवकर बाहेर निघत नाही. तुम्ही एखादे कर्ज घेतलेले असेल आणि त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दुसरे एक कर्ज काढावे लागत असेल तर वेळीच सावध व्हा. लवकरच तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. तुमच्यावर असलेले कर्ज लवकरात लवकर चुकते करून तुम्ही सेव्हिंग तसेच भविष्य सुरक्षित करण्यासंदर्भात विचार केला पाहिजे. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढावे लागत असेल तर ते चुकीचे आहे.

उत्पन्नाचा बराच भाग ईएमआयमध्ये जात असेल तर….

नोकरदार किंवा व्यावसायिकांच्या महिन्यातील एकूण मिळकतीपैकी बराच भाग हा ईएमआय देण्यात जात असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण अर्धा पगार, अर्धे उत्पन्न EMI मध्ये जात असेल तर तुमचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच तुम्ही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

मिनिमम पेमेंटवर अवलंबून असणे

जवळ पैसे नसतील तर अनेकजण क्रेडिट कार्डमधून पैसे खर्च करतात. परंतु याच क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वापरलेले पैसे परत करताना तुम्हाला मिनिमम पेमेंटवर अवलंबून राहावे लागत असेल तर वेळीच सावध व्हा. तुमच्याकडे पैशांची चणचण आहे, हा संकेत यातून मिळतो. त्यामुळेच कर्जाच्या विळख्यात अडकण्याआधी योग्य नियोजन करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इंडस्ट्री सोडून जाण्याच्या तयारीत होता अभिनेता; ‘धुरंधर’ने रातोरात पालटलं नशीब
  • Railway: भारताचे एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं प्लॅटफॉर्म तिकीट नाही दाखवावा लागतो पासपोर्ट, नाव ऐकून बसेल धक्का
  • Chanakya Niti : प्रामाणिक माणसाची पारख कशी करावी? चाणक्य म्हणतात…
  • Salman Khan Fitness: वयाच्या 60 व्या वर्षीही वर्कआउट, सलमानचा संपूर्ण दिनक्रम जाणून घ्या
  • हिवाळ्यात चेहऱ्यावरील कोरडेपणा वाढतो, पार्टीसाठी 2 मिनिटांत चेहरा कसा उजळायचा? जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in