
हिटमॅन रोहित शर्मा लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. रोहितने 351 सामन्यांमध्ये एकूण 13 हजार 913 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 37 शतकं आणि 74 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit : PTI)
द वॉल अर्थात दिग्गज राहुल द्रविड या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. द्रविड यांनी 449 सामन्यांमधील 416 डावांत 15 हजार 271 धावा केल्या आहेत. भारताच्या या माजी दिग्गजाने 21 शतकं आणि तब्बल 112 अर्धशतकं लगावली आहेत. (Photo Credit : PTI)
दादा अर्थात सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गांगुलीने 437 सामन्यांमधील 421 डावांत 31 शतकं आणि 97 अर्धशतकांसह एकूण 15 हजार 622 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI)
तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहली याने लिस्ट ए कारकीर्दीत 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट भारताचा लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. विराटने 343 सामन्यांमध्ये 16 हजार 130 धावा केल्या आहेत. तसेच विराटने 58 शतकं आणि 84 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit :PTI)
भारतासाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 1989 ते 2012 दरम्यान 551 सामन्यांमधील 538 डावांत 60 शतकं आणि 114 अर्धशतकांच्या मदतीने 21 हजार 999 धावा केल्यात. (Photo Credit : @sachin_rt X Account)




Leave a Reply