
भारताने यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही पात्रता मिळवली नाही. त्यामुळे भारतीय फुटबॉलप्रेमींची निराशा झाली आहे. असताना फुटबॉल स्टार लियोनल मेस्सी भारतात आल्याने फुटबॉलप्रेमींच्या आनंदाला पारावर उरला नाही. लियोनल मेस्सीचे लाखो चाहते भारतात आहेत. कोलकात्यात त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. इतकंच काय तर त्यासाठी तिकीटाची रक्कमही भरली होती. पण पदरी निराशा पडली. कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सी आला पण 22 मिनिटातच त्याने काढता पाय घेतला. त्यामुळे चाहत्यांचा संताप झाला. हजारो रूपये भरूनही मेस्सीची एक झलक पाहायला न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. आता मेस्सीला भेटायचं असेल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. आयोजकांना एक मीट अँड ग्रीट पॅकेजची घोषणा केली आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत
आयोजकांनी घोषित केलेल्या मीट अँड ग्रीट पॅकेज अंतर्गत त्याला भेटण्यासाठई 10 रुपये मोजावे लागणार आहे. इतकी रक्कम भरल्यानंतर तु्म्हाला मेस्सीसोबत हस्तांदोलन करता येणार आहे. इतकंच काय तर त्याच्यासोबत फोटोही काढू शकता. 10 लाखांच्या पॅकेजमध्ये हात मिळवण्याची परवानगी आहे. तसेच सहा लोकांसोबत प्रोफेशनल फोटोशूटही करता येणार आहे. इतकंच काय तर या पॅकेजमध्ये प्रिमियम लाउंजमध्ये बसून जेवण आणि नॉन अल्कोहॉलिक ड्रिंक्सचा आनंदही लुटता येणार आहे. दिल्ली लेगसाठी हॉस्पिटॅलिटी श्रेणीचे तिकीट देखील समाविष्ट आहे. आयोजकांनी या भेटीचं वर्णन आयुष्यात एकदाच येणारा अनुभव म्हणून केले आहे.
दरम्यान, कोलकाता आणि हैदराबादच्या चाहत्यांसाठी ही संधी नाही. तर हे पॅकेज दिल्ली आणि मुंबईसाठी उपलब्ध आहे. हैदराबादनंतर मेस्सी मुंबईत येणार आहे. त्यानंतर दिल्लीला जाणार आहे आणि मग मायदेशी परतमआर आहे. पण 10 लाखात फक्त एका व्यक्तीला या संधीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे सामन्य व्यक्तींसाठी दुरून डोंगर साजरे असंच म्हणावं लागेल. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मेस्सी हजेरी लावणार आहे. तेव्हा त्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणचं तिकीट 8250 रुपयांचं आहे. त्यामुळे त्याला सार्वजनिक ठिकाणी पाहण्याची संधी मात्र अनेक जण घेतील.
Leave a Reply