• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latur Crime : चिकन, दारू आणि.. कारमध्ये जळालेल्या गोविंदला गणेशने कसं फसवलं? थंड डोक्याने काढला काटा !

December 17, 2025 by admin Leave a Comment


भगवान के घर देर है, अंधेर नहीं.. है आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. एखादं चुकीचं काम किंवा गुन्हा केला तर तो कधी ना कधी उघडकीस येतोच आणि इथल्या कर्मांची शिक्षा इथेच भोगावी लागते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादी चूक करतोच, ज्यामुळे त्याच्या गुन्ह्याचा (Crime news) सुगावा तर लागतोच पण तो पकडलाही जातो. लातूर जिल्ह्यातील औसा तहसीलमध्ये एक रस्त्यावर जळालेली कार आणि त्यातील मृतदेहामुळे प्रचंड खळबळ उडाली. पण गाडीत ज्याचा मृतदेह सापडला, तो जिवंत असल्याचे उघड झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी, 1 कोटींची रक्कम मिळवण्यासाठी गणेश चव्हाण याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव तर रचला, पण जीव घेतला दुसऱ्याच व्यक्तीचा. लिफ्ट देण्याच्या बहाणायाने त्याने गोविंद किशन यादव यालाच कारमध्ये बसवून, त्याला जाळून मारलं आणि पळ काढला.

या धक्कादायक घटनेचे महत्वाचे अपडेट्स समोर आले असून पैसे मिळवण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव कसा रचला, काय प्लानिंग केलं आणि गोविंद यादव यांना फसवून कसं मारलं, याचे एकेक तपशील आता उघड झाले आहेत. अत्यंत थंड डोक्याने गणेशने गोविंद यादव यांना फसवलं,त्यांचा जीव घेतला, ते सगळे कारनामे आता समोर आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

1 कोटींसाठी रचला बनाव, घेतला दुसऱ्याचा जीव

लातूरच्या औसा तहसीलमध्ये 13 डिसेंबरच्या रात्री रस्त्यावर जळालेली कार होती आणि त्यात मृतदेह सापडला. त्या कारमध्ये एक ब्रेसलेटवरून होतं, त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता ही गाडी गणेश गोपीनाथ चव्हाण चालवत होते अशी माहिती समोर आली, कार अपघातात गणेश याचाच मृत्यू झाल्याचे सर्वजण समजत होते. पण पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्यान त्यांनी सखोल तपास केला त्यावरून आणि मोबाईल लोकेशन आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स केल्यावर पोलिसांसमोर धक्कादायक माहिती आली. ज्या गणेश चव्हाणला ते मृत समजत होते , प्रत्यक्षात तो जिवंत निघाला, तर कारमध्ये आढळलेला मृतदेह हा गोविंद यादव या 50 वर्षांच्या इसमाचा असल्याचे उघड झाले.

थंड डोक्याने घेतला जीव

डोक्यावर लाखोंच कर्ज असल्यामुळे विम्याचे 1 कोटी रुपये मिळवण्यासाठी गणेश चव्हाण याने अत्यंत थंड डोक्याने, नियोजन करून, पद्धतशीरपणे गोविंद यांचा काटा काढला . गोविंद यादव हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात राहणारे एक शेतकरी होते. कामासाठी ते लामजनी पाटी इथं ते आले होते. तिथून ते आपल्या घराच्या दिशेने जात होते, तेव्हा त्यांनी दारू प्यायली होती. औसा तालुका येथे आरोप गणेश याने गोंविदना पाहिलं आणि त्याच्या डोक्यात प्लान शिजला. गणेश याने गोविंद यांच्याशी ओळख केली आणि गोड बोलून त्यांना कारमध्ये बसवलं.

असा काढला काटा

पुढे त्याने एका धाब्यावर कार थांबवली, तिथे त्याने गोविंद यांना पुन्हा भरपूर दारू पाजली, तोही त्यांच्यासोबत मद्य प्यायला. दोघांआंनी चिकन थाळी घेत जेवण केलं, भरपूर दारू प्यायल्या,मुळे गोविंद यादव हे शुद्धीत नव्हते, गणेशचा हेतु साध्य झाला होता. नंतर कार औसा तालुक्यात वानवडा पाटी ते वानवडा रोडवर या निर्जनस्थळी नेऊन गणेश याने गोविंद यांना त्याच्या कारच्या मुख्य, ड्रायव्हिंग सीटवर बसवलं, पळून जाऊ नये मम्हणून सीटबेल्टही लावला. दारूमुळे ते शुद्दीतच नव्हते. हीच संधि साधून गोविंदने काडेपेटीतील काड्या गाडीत टाकल्या, पेट्रोलच्या टाकीचं झाकणंही उघड ठेवलं. नंतर तो बाहेर पडला आणि त्याने कारला आग लावली. बघता बघता का आगीच्या विळख्यात सापडली आणि आत बसलेले गोविंद यांचा होरपळून मृत्यू झाला.

ती चूक नडली

त्यानंतर आरोप गणेश यादव हा तिथून पळूनव गेला, कोल्हापूर मार्गे तो विजयदुर्ग येथे पोहोचला आणि लपून बसला. पण तिथे गेल्यावर त्याने एक चूक केली जी त्याला महागात पडली. त्याच्याकडे असलेल्या आणखी एका मोबाईलवरून तो मैत्रिणीली मेसेज करत होता. पोलिसांनी मृत गणेशबद्दल चौकशी सुरू केल्यावर मैत्रिणीबद्दल समजलं, तिच्याकडे चौकशीसाठी गेल्यावर त्यांना संशय आला. गणेश हा मेसेजेस करत होता ते पाहून पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी सखोल तपास करत अखेर विजयदुर्ग येथून आरोपी गणेश याला बेड्या ठोकत अटक केली. अशा प्रकारे त्याच्या क्रूर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. आरोपी गणेश सध्या पोलिसांच्या कोठडीत असून त्याला आणखी कोणी मदत केली का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हिवाळ्यात Dry Skin मुळे त्रस्त? आता No Tention, करा हा साधा घरगुती उपाय
  • Pradnya Satav: मराठवाड्यात काँग्रेसला धोबीपछाड, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर? अशोक चव्हाण यांच्यानंतर मोठा धक्का
  • NCP Leaders Meet Amit Shah : दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहा यांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं! नेमकं घडतंय काय?
  • लाज वाटली पाहिजे….; “कँडी शॉप” या गाण्यातील अश्लील डान्स स्टेपमुळे नेहा कक्करवर भडकले नेटकरी; प्रचंड ट्रोल
  • Municipal Election: मोठी बातमी! सोलापूर महापालिकेची निवडणुकीला ब्रेक? का होत आहे मागणी, कारण तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in