
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक पात्र महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरीच्या काळात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आलेल्या अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्रे गमावली होती. याचा परिणाम ई-केवायसी करण्यावर झाला होता.
याशिवाय, विधवा, एकल आणि विभक्त झालेल्या महिलांना (डिव्होर्सी) ई-केवायसी करताना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. आता या महिला त्यांच्या अंगणवाडी सेविकांकडे त्यांची कागदपत्रे उपलब्ध करून देऊन ई-केवायसी प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करू शकतात. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, त्याला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले.
Leave a Reply