
Shivsena-BJP Mahayuti: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका आणि वाटाघाटीनंतर केडीएमसी निवडणुकीत अखेर शिवसेना भाजपा महायुतीचा फॉर्मुला आज ठरला. शिवसेनेला 67 आणि भाजपाला 54 जागा मिळाल्या मात्र कल्याण पूर्वमध्ये अवघ्या सात जागा मिळालेल्या भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालया बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका अन्यथा भाजपा कल्याण पूर्व स्वबळावर लढेल अशी घोषणाबाजी केली .एकंदरीतच महायुती चा फॉर्मुला ठरला असला तरी या फॉर्मुल्यामुळे शिवसेना भाजपा मधील वाद वाढला असल्याचे दिसून येत आहे.
कार्यकर्त्यांच्या भावना अनावर, व्यक्त केला संताप
वरिष्ठ नेत्यांनी जागावाटप करताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले नसल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला तसेच मित्र पक्षांमुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय द्यावा ,वरिष्ठापर्यंत आमचे म्हणणे पोहोचवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष नंदुर परब तसेच निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांच्याकडे केली .यावेळी नाना सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवु, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू मात्र प्रत्यक्षात भाजपाला कमीच जागा मिळाल्याचे मान्य केले .तसेच याबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे देखील सांगितले .काही केल्या भाजप कार्यकर्त्यांचे नाराजी दूर होत नव्हती. त्यामुळे एकंदरीतच आता महायुतीचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
कल्याण–डोंबिवलीत शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मुलाखतींना वेग
कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026 निवडणुकीसाठी कल्याण पश्चिम मधील मुलाखतींना वेग आला आहे. पश्चिममधील दहा पॅनल साठी 166 उमेदवारांनी मुलाखत दिलेले आहे. महायुतीसाठी आमची चर्चा झाली आहे. निर्णय झाला नाही चर्चा आमची सुरू आहे. कोणाला किती जागा आणि काय निर्णय झाला आहे एकनाथ शिंदेच जाहीर करतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी दिली.
जागावाटप संदर्भात जी माहिती येत आहे ती खोटी आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते बसलेले आहेत. ज्यांच्याकडे सीटिंग जागा आहेत ते त्यांना मिळणार. आहेत. भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या जी लोक आहेत त्यांना त्यांच्या जागा देण्यात येणार आहे. महायुतीत कुठला वाद नाही.30 तारखेला तीन वाजेपर्यंत मुदत त्यापूर्वी योग्य लोकांना ए बी फॉर्म दिले जाणार आहे. सीटिंग जागा व जे इथे तिथे गेलेले आहेत त्या जागेवर वार्डनुसार चर्चा होईल. महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला.
Leave a Reply