
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील आणि इतर राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी सध्या वातावरण तापले आहे. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. जरांगे पाटील यांना प्रगाढ पंडित संबोधत, त्यांची आज पाकिस्तानात खूप गरज असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. जरांगे व्यवसायात जाऊन काय करणार आहेत, असा सवाल करत, हाके यांनी त्यांची नियुक्ती युनोमध्ये (UNO) करावी, अशी सूचनाही केली. “किती ज्ञानवान माणूस आहे तो. यांची कुठेतरी आंतरराष्ट्रीय युनो-बिनोमध्ये कुठेतरी नेमणूक करावी,” असे हाके म्हणाले.
यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी, “त्याला बोलतोय ना मी, गिणतच नाही मी त्याला. ते कोण आहे तेही माहित नाही. हे प्रॉडक्ट आमचंच आहे. कारण ते आमच्याच आंदोलनामुळं, मराठ्यांच्या ह्याच्यामुळंच आत्ता उदयाला आलंय ते. त्याच्यावर काय बोलायचं,” असे म्हणत लक्ष्मण हाके यांना महत्त्व देण्यास नकार दिला.
Leave a Reply