• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Jamie Lever : तान्या मित्तलची मिमिक्री करणं पडलं महागात, जेमी लिव्हरचा धक्कादायक निर्णय..

December 26, 2025 by admin Leave a Comment


अभिनेता जॉनी लिव्हर यांची कन्या जेमी ही वडिलांप्रमाणेच खूप प्रतिभावान असून आहे. जेमी लिव्हर ही तिच्या कॉमेडी शो आणि मिमिक्री व्हिडिओंद्वारे चाहत्यांना हसवत असते. तिच्या कामाचं खूप कौतुक होतं, तिचे विविध व्हिडीओ खूप लोकप्रिय होतात. जेमीचं फॅन फॉलोईंगही खूप मोठं आहे. मात्र, यावेळी, तिने केलेली तान्या मित्तलची नक्कल चाहत्यांना फारशी आवडली नाही. त्यानंतर तान्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केलं. या सगळ्या गोष्टींना वैतागून जेमीने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावरून थोड्या काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेमीच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोशल मीडियावरून ब्रेक 

जेमी लीव्हरने इंस्टाग्रामवर एका लांबलचक पोस्टद्वारे सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याी जाण्याची घोषणा केली. “जे मला खरोखर ओळखतात त्यांना माहित आहे की मी माझ्या कामात किती खोलवर गुंतलेली आहे आणि मी ते किती प्रामाणिकपणे करते.” असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं होतं.

पुढे ती म्हणाली, ” इतरांना आनंद देण्याची ही संधी दिल्याबद्दल मी देवाची आभारी आहे. गेल्या काही वर्षांत मला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन. पण प्रत्येक जण तुमच्यावर खुश नसेल हेही मी या प्रवासत शिकले. प्रत्येकजण टाळ्या वाजवणार नाही आणि प्रत्येकजण तुमच्यासोबत हसणार नाही.” असं तिने नमूद केलं.

एक छोटासा भाग गमावला

जेमी एवढ्यावरच थांबली नाही. आपण सोशल मीडियापासून ब्रेक का घेत आहोत, याबद्दल तिच्या भावना शेअर केल्या. “अलीकडील घटनांमुळे मला असे वाटू लागले आहे की मी स्वतःचा एक छोटासा भाग गमावला आहे. आणि ही जाणीव मला रागातून नाही तर चिंतन आणि आत्मनिरीक्षणातून झाली. मला माझं काम आवडतं आणि मी नेहमीच लोकांचे मनोरंजन करत राहीन. सध्या मी थोडा ब्रेक घेत आहे आणि आराम करणार आहे. पुढल्या वर्षी पुन्हा भेटूया. तुमचं प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद ” असं जेमीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

नेमकं काय झालं होतं ?

खरंतर, काही आठवड्यांपूर्वी, जेमी लीव्हरने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तिने तान्या मित्तलची नक्कल केली होती. तिचा अभिनय इतका प्रामाणिक होता की ती रडत होती ते खरंखुरं वाटत होतं. मात्र, हा व्हिडिओ पाहून तान्या मित्तलचे चाहते संतापले. त्यांनी सोशल मीडियावर जेमी लीव्हरला ट्रोल केले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्व प्रयत्न..; 19 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याविषयी मराठमोळी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली
  • कुत्र्यासाठी दोन बहिणींनी स्वतःला संपवलं… तुम्ही म्हणाल हे काय? पण वास्तव अत्यंत भयानक
  • Rohit Sharma VHT 2025 : पहिल्या सामन्यात सेंच्युरी पण दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माची अशी हालत, VIDEO
  • उमेदवारी अर्ज भरला तर गाठ आमच्याशी… कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
  • Shehnaaz Gill : ठेच लागल्यानंतर शहाणपण आलं… शेहनाजचं मोठं वक्तव्य, म्हणाली, ‘सगळे राक्षण आहेत येथे…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in