• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ishan Kishan : ईशानचा धमाका, 33 षटकारांसह 516 धावा, टीम इंडियात कमबॅकचा दावा, गंभीर संधी देणार?

December 18, 2025 by admin Leave a Comment


झारखंड क्रिकेट टीमचा कॅप्टन ईशान किशन याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत हरयाणा विरुद्ध वादळी शतक झळकावलं. ईशानने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ईशानने या शतकासह खास कामगिरी केली. ईशान सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच ईशानने या खेळीसह श्रेयस अय्यर याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. श्रेयसने कर्नाटक विरुद्ध नाबाद 98 धावांची खेळी केली होती.

ईशान या शतकी खेळीसह टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आहे. ईशान गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. तसेच टीम इंडिया आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंड विरुद्ध एकूण 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेतून ईशानचं टीम इंडियात कमबॅक होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र हेड कोच गौतम गंभीर ईशानला संधी देण्याचा विचार करणार का? हा देखील प्रश्न आहे.

ईशानचा SMAT 2025 मध्ये धमाका

ईशानने सय्यद मुश्ताक अली 2025 ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने धमाकेदार कामगिरी केलीय. ईशानने या मोसमात 33 षटकार आणि 50 पेक्षा अधिक चौकारांच्या मदतीने एकूण 516 धावा केल्या आहेत. ईशानने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. इशानने या दरम्यान 2 शतकं झळकावली आहेत. ईशानची नॉट आऊट 113 ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

ईशानला ती चूक महागात!

ईशान किशन गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. ईशानने अखेरचा टी 20I सामना हा 28 नोव्हेंबर रोजी खेळला होता. तेव्हा टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होती. ईशान तेव्हा दक्षिण आफ्रिका दौरा अर्धवट सोडून भारतात परतला होता. ईशान तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र आता ईशान गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावा करतोय. त्यामुळे ईशानला टीम मॅनजमेंटकडून कमबॅकची संधी मिळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

ईशानची आयपीएल टीम

दरम्यान मंगळवारी 16 डिसेंबरला आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026 Mini Auction) मिनी ऑक्शन पार पडलं. एकूण 10 फ्रँचायजींनी 369 पैकी 77 खेळाडूंची लिलावातून निवड केली. त्यानंतर आता मार्च 2026 पासून स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ईशान किशन या मोसमात सनरायजर्स हैदराबाद टीमकडून खेळणार आहे. हैदराबादने ईशानला 11 कोटी 25 लाख रुपयांत रिटेन केलं होतं. ईशानने 18 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 354 धावा केल्या होत्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BMC Election 2026 : मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती होणार का? संजय शिरसाट यांच्याकडून महत्वाची अपडेट
  • Epstein Files: महिलेच्या अंगावर कांदबरीच्या ओळी, एका रात्रीचा मुलीचा रेट किती? एपस्टिन फाईल्समधील धक्कादायक खुलासे
  • ‘किंग’ चित्रपट रिलीज होण्याआधीच गाणे लीक? शाहरुख खान अन् दीपिकाचा किसींग सीन व्हायरल?
  • Osman Hadi: उस्मान हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून फरफटत आणा, नाहीतर…इंकलाब मंचाची मोठी धमकी, भारत-बांगलादेश सीमेवर वाद भडकणार?
  • 51 वर्षांनी लहान ‘धुरंधर’ फेम साराला किस केल्यामुळे राकेश बेदी ट्रोल; अखेर टीकेवर सोडलं मौन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in