
आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शनध्ये 369 खेळाडूंचा निकाल लागणार आहे. मिनी ऑक्शमध्ये 369 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. तसेच ऑक्शनसाठी निवड करण्यात आलेल्या एकूण 369 पैकी 253 खेळाडू हे भारतीय आहेत. त्यात 16 कॅप्ड खेळाडू आहेत. तर 116 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 10 फ्रँचायजींना 369 पैकी फक्त आणि जास्तीत जास्त 77 खेळाडूंचीच गरज आहे. त्या 77 खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त 31 जागा या विदेशी खेळाडूंच्या आहेत. आता कोणती फ्रँचायजी कोणत्या खेळाडूला आपल्या गोटात घेण्यात यशस्वी ठरणार? हे आपण लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply