
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शनचा थरार सुरु आहे. या मिनी ऑक्शनमध्ये 5 स्टार खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईज इतकीच रक्कम मिळाली आहे. या खेळाडूंना तगडा अनुभव आहे. मात्र त्या खेळाडूंसाठी 10 पैकी कोणत्याही फ्रँचायजीने बोली लावली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना बेस प्राईज इतकीच रक्कम मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (Photo Credit: PTI)
इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन याची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती. दिल्ली कॅपिट्ल्सने डकेटला 2 कोटी रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. (Photo Credit: PTI)
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी विकेटकीपर ओपनर क्विंटन डी कॉक याची 1 कोटी रुपये बेस प्राईज होती. मुंबई इंडियन्सने डी कॉक याला बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. यासह डी कॉक याची घरवापसी झाली. क्विंटन डी कॉक याने रोहित शर्मा याच्यासह याआधी आयपीएलमध्ये ओपनिंग केली आहे. त्यामुळे डी कॉक याला रोहितसोबत ओपनिंगची संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit: PTI)
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याच्यावर मोठी बोली लागेल, असा अंदाज होता. मात्र मिलरला 2 कोटी (बेस प्राईज) मिळाले. दिल्ली कॅपिट्ल्सने मिलरला आपल्या ताफ्यात घेतलं. (Photo Credit: PTI)
न्यूझीलंडच्या फिन एलेन याने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये निश्चित केली होती. कोलकाता नाईट रायडर्सने फिनला त्याच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. (Photo Credit: PTI)
लखनौ सुपर जायंट्सने श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा याला यशस्वीरित्या आपल्या टीममध्ये घेतलं. वानिंदुची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी होती. (Photo Credit: PTI)





Leave a Reply