
आयपीएल स्पर्धेत दोन वर्षानंतर सरफराज खानचं कमबॅक झालं आहे. सरफराज खान 2023 मध्ये शेवटची आयपीएल स्पर्धा खेळला होता. मात्र त्यानंतर त्याला संघात घेण्यास कोणत्याही फ्रेंचायझीने रस दाखवला नाही. (Photo: AFP)
सरफराज खान आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. खरं तर पहिल्या फेरीत त्याला घेण्यास कोणीही रूची दाखवली नाही. पण दुसऱ्या फेरीत त्याला 75 लाखांच्या बेस प्राईससह सीएसकेने घेतलं आहे. (Photo: PTI)
सरफराज खानने 2015 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 आणि 2018 च्या पर्वात आरसीबीकडूनही खेळला.2019 मध्ये पंजाब किंग्जने त्याला करारबद्ध केले. दोन वर्षे या फ्रेंचायझीकडून खेळा.2022 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. दोन वर्षे या फ्रेंचायझीकडून खेळला. (Photo: PTI)
आयपीएलमध्ये सरफराज खानने 50 सामन्यांमध्ये 37 डावांमध्ये 585 धावा केल्या आहेत. त्याने फक्त एक अर्धशतक झळकावले आहे. सरफराज खानचा आयपीएल 2019 मध्ये पाच डावांमध्ये 180 धावा केल्या. त्याचे एकमेव अर्धशतकही पर्वात आले. (Photo: PTI)
सरफराज खान सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सात सामन्यांमध्ये तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. राजस्थानविरुद्ध फक्त 22 चेंडूत 73 धावांची खेळी समाविष्ट आहे. या खेळीत त्याने फक्त 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. (Photo: PTI)




Leave a Reply