
आयपीएल 2026 मिनी लिलावात सर्व फ्रेंचायझींच्या नजरा या अनकॅप्ड प्लेयर्स आणि युपीचा युवा अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरवर लागल्या होत्या. 20 वर्षीय या खेळाडूसाठी प्रशांत वीरसाठी चार फ्रेंचायझींनी बोली लावली. प्रशांत वीर पॉवर हिंटिंग करण्यात माहिर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज असून अष्टपैलू कामगिरी करतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने सात सामन्यात 169.19 च्या स्ट्राईक रेटने आणि 37.33 च्या स्ट्राईक रेटने 112 धावा केल्या. तसेच सात डावात 9 विकेट घेतल्या आहे. त्याची ही कामगिरी पाहता फ्रेंचायझीचा त्याच्यावर डोळा होता. आयपीएल मिनी लिलावात त्याच्यासाठी लागलेल्या बोलीवरून ही बाब स्पष्ट झालं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 28 कोटी 40 लाख रुपये मोजले. अनकॅप्ड प्लेयर्ससाठी इतके कोटी मोजण्याची ही चेन्नई सुपर किंग्सची ही पहिलीच वेळ आहे. कारण दोन खेळाडूंसाठी प्रत्येकी 14.20 कोटी मोजले. हे प्लेयर्स कोण आहे ते जाणून घेऊयात…
प्रशांत वीर
अनकॅप्ड फिरकीपटू प्रशांत वीरसाठी जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळाली. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने बोली लावली. त्याची बेस प्राईस 30 लाख होती. मुंबई इंडियन्सने त्याला घेण्यात रस दाखवला होता. पण हा खेळाडूची किंमत आणि पर्समध्ये असलेली रक्कम पाहता मुंबई इंडियन्सने काढता पाय घेतला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जुंपली. शेवटच्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायर्स हैदराबाद आमनेसामने आले आणि अखेर चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. 14.20 कोटीला चेन्नई सुपर किंग्सने त्याला तंबूत घेतलं.
कार्तिक शर्मा
कार्तिक शर्मासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जुंपली होती. 30 लाखांची बेस प्राईस असताना त्याच्यासाठी बोली लागली होती. 13 कोटींपर्यंत रक्कम पोहोचल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने काढता पाय घेतला. पण सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. पण चेन्नई सुपर किंग्स काय मागे हटलं नाही. चेन्नईने या वेळी पुन्हा एकदा बोली करत बाजी मारली. चेन्नई सुपर किंग्सने 14.20 कोटी मोजले.
Leave a Reply