
आयपीएल 19 व्या मोसमासाठी (IPL 2026) मिनी ऑक्शन पार पडलं. एकूण 10 फ्रँचायजींनी 77 खेळाडूंना आपल्या गोटात घेतलं. कॅमरुन ग्रीन हा मिनी ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमरुनसाठी केकेआरने 25 कोटी 20 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI)
श्रीलंकेचा गोलंदाज मथीशा पथिराणा याने इतिहास घडवला. मथीशा पथिराणा या मिनी ऑक्नशमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तसचे मथिशाने आयपीएलमधील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला. केकेआरने मथीशासाठी 18 कोटींची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. (Photo Credit : PTI)
कार्तिक शर्मा या अनकॅप्ड भारतीय खेळाडूला विक्रमी भाव मिळाला. कार्तिकला देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीचा मिनी ऑक्शनमध्ये तगडा फायदा झाला. चेन्नई सुपर किंग्सने कार्तिक शर्मा याला 14 कोटी 20 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. (Photo Credit :PTI)
प्रशांत वीर हा अनकॅप्ड खेळाडूही चमकला. प्रशांतला कार्तिक इतकाच भाव मिळाला. चेन्नईने प्रशांतसाठी 14 कोटी 20 लाख रुपये मोजले. कार्तिक आणि प्रशांत हे दोघे संयुक्तरित्या तिसरे सर्वात महागडे खेळाडू ठरले. (Photo Credit : Instagram)
तसेच लियाम लिविंगस्टोन या मिनी ऑक्शनमधील चौथा महागडा खेळाडू ठरला. सनरायजर्स हैदराबादने लियामला 13 कोटी रुपयांत आपल्या टीममध्ये घेतलं. (Photo Credit : PTI)




Leave a Reply