• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Auction: फक्त 4 सामनेच खेळणार, तरीही फ्रँचायजीकडून कोटींचा भाव, कोण आहे तो?

December 16, 2025 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 साठी दुबईत 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमधून ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन जोश इंग्लिस याला लखनौ सुपर जायंट्सने आपल्या ताफ्यात घेतलं. लखनौने इंग्लिससाठी 8 कोटी 60 लाख रुपये मोजले. (Photo Credit : PTI)

Josh Inglis IPL Team

जोस इंग्लिस याला त्याच्या लौकीकापेक्षा कमी भाव मिळाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र इंग्लिस या 19 व्या हंगामात केवळ 4 सामनेच खेळणार आहे. मात्र त्यानंतरही इंग्लिसला 8 कोटींपेक्षा जास्त भाव मिळाला. (Photo Credit : PTI)

Josh Inglis IPL 2026 Rate

जोश इंग्लिस याचं आयपीएल 2026 च्या मोसमादरम्यान लग्न होणार आहे. त्यामुळे इंग्लिस फक्त 4 सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. इंग्लिसने ऑक्शनआधीच याबाबत कळवलं होतं. मात्र त्यानंतरही लखनौने इंग्लिससाठी इतकी मोठी बोली लावली. (Photo Credit : PTI)

Josh Inglis IPL 2026 Team

जोशला आपल्या गोटात घेण्यासाठी लखनौला आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चुरस पाहायला मिळाली. हैदराबादने इंग्लिससाठी 8 कोटी 40 लाख इतकी बोली लावली. मात्र लखनऊने मैदान मारलं आणि इंग्लिसला आपल्या ताफ्यात घेतलं. (Photo Credit : PTI)

Josh Inglis Instagram

जोशने आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 11 सामन्यांमध्ये 278 धावा केल्या. जोश टॉपपासून लोअर ऑर्डरमध्ये कुठेही बॅटिंग करु शकतो. आता जोश या आगामी मोसमातील 4 सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतो? याच्याकडे टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Knowledge : जन्म झाल्यावर बाळ सर्वात अगोदर का रडते? बाळाला हसू का येत नाही? जाणून घ्या!
  • आयपीएल लिलावाच्या दिवशी भारताच्या या खेळाडूने ठोकल्या 209 धावा, पण…
  • Rahu Gochar 2026: संकट घेऊन येणाऱ्या राहूचे गोचर,या राशींचे बदलेल नशीब, दुप्पट वेगाने होणार प्रगती!
  • करून दाखवलं म्हणता-म्हणता… शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, व्यंगचित्र शेअर करत साधला निशाणा
  • GK : एअर होस्टेसच्या गळ्यात स्कार्फ का असते? उत्तर वाचून हैराण व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in