
भारतीय महिला संघाने सलग तिसरा टी20 सामना जिंकून मालिका खिशात घातली. भारताने 2 गडी गमवून श्रीलंकेने दिलेलं 113 धावांचं लक्ष्य गाठलं. यासह भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग चौथी टी20 मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2014 मध्ये भारताने मालिका गमावली होती. तेव्हा या दोन संघात पहिल्यांदाच मालिका खेळली गेली होती. (Photo- BCCI Women Twitter)
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शिरपेचात एक मानाची तुरा खोवला गेला आहे. एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान तिला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्ध 20 सामन्यांपैकी 16 सामने जिंकले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर चार्लोट एडवर्ड्स असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 पैकी 14 सामने जिंकलेत. हरमनप्रीत कौरने बांगलादेशविरुद्ध 17 पैकी 14 सामने जिंकलेत. (Photo- BCCI Women Twitter)
हरमनप्रीतला महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरली आहे. हरमनप्रीतने आतापर्यंत कर्णधार म्हणून 130 पैकी 77 सामने जिंकले आहेत.तिने ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकले आहे. (Photo- BCCI Women Twitter)
शफाली वर्माने भारताच्या धावांपैकी 68.69 टक्के धावा केल्या. वुमन्स टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी एका पूर्ण डावात एकाच महिला फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी हरमनप्रीत कौरने 2011 मध्ये बिलेरिके येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या 636.12 टक्के धावा केल्या होत्या. (Photo- BCCI Women Twitter)
श्रीलंकेविरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान शफाली वर्माला मिळाला आहे. यापूर्वी हा विक्रम जेमिमा रॉड्रिग्सच्या नावावर होता. तिने 76 धावा केल्या होत्या. आता शफाली वर्माने नाबाद 79 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुसरीकडे, शफालीने टी20 क्रिकेटमध्ये 300 चौकार पूर्ण केले. (Photo- BCCI Women Twitter)




Leave a Reply