
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20i सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा पाचवा सामना मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर होती. मात्र या मालिकेचा काय निकाल लागणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना होती. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची संधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला पराभूत करुन मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचं आव्हान होतं. त्यामुळे पाचवा सामना फार निर्णायक असा होता. मात्र टीम इंडियाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात करत सामन्यासह मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडियाने तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांनी अर्धशतकी खेळी करुन भारताला 231 धावांपर्यंत पोहचवलं. तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला वरुण चक्रवर्ती याच्या फिरकीसमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 201 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने यासह ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली.
Leave a Reply