
5th Gen Fighter Jet Technology : भारत फायटर जेट्सच्या कमतरतेचा सामना करतोय हे सर्वांना माहित आहे. सध्या भारताकडच्या स्क्वाड्रनची संख्या 42 वरुन 30 वर आली आहे. सर्वात मोठं आव्हान स्वबळावर फायटर जेटच्या निर्मितीचं आहे. फायटर जेट्स हे काही वॉशिंग मशीन किंवा रेफ्रिजेटर नाही, बाजारात गेलात आणि विकत घेऊन आलात. फायटर विमान बनवणं हे खूप जटिल तंत्रज्ञान आहे. या एम्का प्रोजेक्टवर काम करताना आपल्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. DRDO ने मॉर्फिंग विंग टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केली आहे.
ही अशी टेक्नोलॉजी आहे, जी जगातील काही निवडक कंपन्यांकडे आहे. उदहारणार्थ एअरबस आणि नासा. या टेक्नोलॉजीवर सध्या अमेरिका आणि युरोप या दोघांचा कब्जा आहे. चीन आणि रशियाने सुद्धा पाचव्या पिढीची फायटर जेट्स बनवली आहेत. पण त्यांच्याकडे सुद्धा इतकी अचूक टेक्नोलॉजी आहे का? यावर तज्ज्ञांना संशय आहे.
ही खूप महत्वाची टेक्नोलॉजी का?
फिफ्थ जेन फायटर जेटसाठी ही खूप मोठी टेक्नोलॉजी आहे. ही अशी टेक्नोलॉजी आहे, ज्यामध्ये फायटर जेट्स आपले पंख पक्ष्यांसारखे आत घेऊ शकतात. म्हणजे हवेत उड्डाणवस्थेत पंखांचा आकार कमी-जास्त करुन बदलता येतो. गरज पडल्यास पंख लपवता येतात. आकाशात एका उंचीवर स्थिर झाल्यानंतर पंख लपवता येतात. अशी विमान अगदी सहजतेने शत्रुच्या रडारपासून स्वत:चा बचाव करु शकतात. पंख आत घेतल्यामुळे विमानाचा आकारही बदलतो. पाचव्या पिढीच्या फायटर विमानासाठी ही खूप महत्वाची टेक्नोलॉजी आहे. जगातील निवडक देश, कंपन्या यांच्याकडेच ही टेक्नोलॉजी आहे.
कुठे-कुठे होणार फायदा?
डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी ही टेक्निक विकसित केली आहे. याचं यशस्वी परीक्षण केलं आहे. येणाऱ्या काळात फायटर जेट्समध्ये त्याचा समावेश केला जाईल. एक्सपर्टनुसार, या टेक्नोलॉजीचा थेट फायदा एम्का प्रोजेक्टसह मानवरहित विमानांच्या विकासात होईल.
या टेक्निकला शेप मेमोरी अलॉय म्हणतात
ही खूपच खास टेक्निक आहे. यात पंख एका खास धातूपासून बनवलेले असतात. एका विशेष तापमानात गरम झाल्यानंतर ते पसरतात. थंड झाल्यानंतर ते आकुंचन पावतात. गरम आणि थंड होण्याची ही प्रक्रिया काही सेकंदात पार पडते. फायटर जेट्सना उड्डाण करताना हवेचा दबाव मॅनेज करायचा असतो. हीट वाढल्यानंतर पंखांची साइज वाढते. या टेक्निकला शेप मेमोरी अलॉय म्हटलं जातं.
आकार बदलून शत्रुला चकवा देता येतो
या टेक्नोलॉजिची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात पारंपारिक पंखाप्रमाणे कुठे कट किंवा जोड नसतो. त्यामुळे रडाराला ही विमान सहजतेने सापडत नाहीत. या टेक्निकमध्ये पंख प्रति सेकंद 35 डिग्रीच्या वेगाने आकार बदलतात. अवघ्या 0.17 सेकंदांमध्ये संपूर्ण शेप बदलतो. डॉगफाइट म्हणजे दोन फायटर जेट्समध्ये आमना-सामना होतो, तेव्हा वेगाने आपला आकार बदलून शत्रुला चकवा देता येतो.
Leave a Reply